मुख्य सामग्री पर जाएँ

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले, "माझ्या विरोधात महिलांची टोळी तयार केली जात आहे"

•Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा; मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीसह पक्षांतर्गत नेत्यांवर साधला थेट निशाणा

व
विवेक

2 मिनट पठन

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले, "माझ्या विरोधात महिलांची टोळी तयार केली जात आहे"

•Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा; मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीसह पक्षांतर्गत नेत्यांवर साधला थेट निशाणा

परभणी :- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी परभणी येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. "माझ्या विरोधात पद्धतशीरपणे महिलांची एक टोळी तयार केली जात असून, या संदर्भातील काही महिला प्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेल्या होत्या," असा दावा जरांगे पाटील यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) आणि त्यांच्या खास यंत्रणेचा उल्लेख करत जरांगे यांनी हे आरोप केले असून, मुख्यमंत्र्यांनी पुरावे मागितल्यास ते तात्काळ सादर करण्याची आपली तयारी असल्याचेही स्पष्ट केले.

सत्ताधाऱ्यांवर नाव न घेता आक्रमक टीका आणि 'गेम'चा इशारा

या संवादादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी केवळ मुख्यमंत्र्यांवरच नाही, तर सत्ताधारी पक्षांतील इतर प्रमुख नेत्यांवरही नाव न घेता जोरदार प्रहार केले. "आम्ही ज्या नेत्याला डोक्यावर घेऊन नाचलो आणि ज्यांचा सन्मान वाढवला, तोच माणूस आता आमच्या विरोधात कारस्थानं रचत आहे. अशा लोकांना इतक्या उंचीवर नेऊन ठेवल्याचा आता पश्चाताप होत आहे," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. याच मुद्द्यावरून पुढे इशारा देताना, "मी प्रत्यक्ष करणाऱ्याला नाही, तर मागून हे कारस्थान करून घेणाऱ्याचाच गेम वाजवतो," असा गंभीर इशाराही त्यांनी दिला.

कथित ऑडिओ क्लिप आणि एसआयटी (SIT) चौकशीची पार्श्वभूमी

मनोज जरांगे पाटील यांनी सुमारे 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्रासमोर एक कथित ऑडिओ क्लिप जाहीर केली होती. या क्लिपमध्ये मनोज जरांगे यांना मॅनेज करण्यासाठी 500 कोटी रुपये देण्यात आल्याचा गंभीर दावा एका महिलेकडून केला जात असल्याचे ऐकायला मिळाले होते. या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती आणि सत्ताधारी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फेरी रंगली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली असून, आता जरांगे पाटील यांच्या या नवीन आरोपामुळे मराठा आरक्षण आणि राजकीय वादाला अधिक धार आली आहे.

हेही वाचा: दिल्लीतील त्या भेटीची वेळ सुनेत्रा पवारांनीच ठरवून दिली होती; राष्ट्रवादीकडून राजकीय चर्चांवर स्पष्टीकरण

शेयर करें