EOW Pune : १२.५८ कोटींची फसवणूक; सुशील अग्रवाल व विशाल अग्रवाल यांच्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा
पुणे, महाराष्ट्र मिरर :
1 मिनट पठन

EOW Pune : 'द वाईब' प्रकल्पासाठी बँकेकडून ३० कोटींचे प्रोजेक्ट लोन मंजूर असल्याचा दावा; दुकाने, गुंतवणूक आणि परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकाची कोट्यवधींची फसवणूक
पुणे, महाराष्ट्र मिरर :
EOW Pune : कोरेगाव पार्क परिसरातील 'द वाईब' या व्यावसायिक प्रकल्पातील दुकाने विक्री, गुंतवणुकीवर आकर्षक परतावा आणि प्रकल्पासाठी बँकेकडून ३० कोटी रुपयांचे प्रोजेक्ट लोन मंजूर असल्याचे सांगून एका व्यावसायिकाची तब्बल १२ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी सुशील धनश्याम अग्रवाल आणि विशाल धनश्याम अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपविण्यात आला आहे. (eow pune fraud case sushil vishal agrawal)
Moshi Tragedy : मोशीतील कचरा डेपोचे कनेक्शन उरुळीच्या कचरा डेपोपर्यंत
फिर्यादी सज्जाद हुसेन गुलाम हुसेन गबरानी (रा. बोटक्लब रोड, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी 'मे. गगन टायटॅनियम स्पेसेस एलएलपी'च्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथील 'द वाईब' प्रकल्पासाठी बँकेकडून ३० कोटी रुपयांचे प्रोजेक्ट लोन मंजूर झाल्याचे भासवून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर प्रकल्पातील दुकाने विक्री तसेच मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक स्वीकारली.

तक्रारीनुसार, प्रकल्पातील तीन दुकाने 'आर्टिकल ऑफ अॅग्रीमेंट' द्वारे विकल्याचे दाखवून संबंधित मालमत्तेवर कोणतेही कर्ज नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच फिर्यादी आणि त्यांच्या पत्नींकडून ११ कोटी रुपये गुंतवणुकीच्या स्वरूपात स्वीकारून ठरल्याप्रमाणे परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, मुदत संपल्यानंतरही रक्कम परत करण्यात आली नाही.

याशिवाय, प्रकल्पातील आणखी तीन दुकाने खरेदीसाठी नोंदणी, जीएसटी आणि इतर शुल्काच्या नावाखाली १ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपये स्वीकारण्यात आले. मात्र आजपर्यंत संबंधित ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले नसून दुकानांचा ताबाही देण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोपींनी एकूण १२ कोटी ५८ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
कोरेगाव पार्क पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडळे करीत आहेत.

