मुख्य सामग्री पर जाएँ

D Y Patil : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

कोल्हापूर, महाराष्ट्र मिरर

धओ
धनश्री ओटारी

1 मिनट पठन

D Y Patil

D Y Patil : महाराष्ट्राचे दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांचे

कोल्हापूर, महाराष्ट्र मिरर

D Y Patil : महाराष्ट्राचे दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्रिपुरा व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील (डॉ. डी. वाय. पाटील) यांचे आज कोल्हापूर येथे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते दरम्यान, त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी शोककळा पसरली आहे. dr dy patil passed away

Pune: रस्त्यावर ऑइल-चिखलाचा थर; 15 वाहनांची घसरगुंडी

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी आपल्या अफाट जिद्दीच्या आणि कर्तृत्वाच्या बळावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उच्च शिखर गाठले. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मंत्री म्हणून महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत त्यांना बिहार आणि त्रिपुरा राज्याच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळण्याची संधी मिळाली.

राजकारणापलीकडे जाऊन डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्रात आणि देशात शिक्षणाचा पाया विस्तारण्याचे मोठे कार्य केले. रयतेच्या दारात उच्च व तांत्रिक शिक्षण पोहोचावे, या उद्देशाने त्यांनी कोल्हापूर, नवी मुंबई, पुणे अशा विविध ठिकाणी अनेक नामवंत शाळा, महाविद्याघे आणि विद्यापीठांची (D. Y. Patil Group) स्थापना केली. त्यांच्या या शैक्षणिक योगदानामुळे लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची द्वारे खुली झाली, म्हणूनच त्यांना 'शिक्षणमहर्षी' म्हणून ओळखले जात असे.D Y Patil

FRA च्या ‘बेकायदा’ शुल्कवाढीमुळे विद्यार्थी-पालकांना कोट्यवधीचा आर्थिक भुर्दंड

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

त्यांच्या पार्थिवावर उद्या कोल्हापूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक जनमानसात लोकप्रिय नेता आणि महान शिक्षणतज्ज्ञ गमावला आहे.D Y Patil

शेयर करें