Dharmendra Pradhan : "जबाबदार पदांवर बसलेल्यांनीच अडथळे आणले"; राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधान यांचे गंभीर आरोप
Dharmendra Pradhan : नीट-यूजी (NEET-UG) परीक्षेच्या निमित्ताने देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
3 मिनट पठन

Dharmendra Pradhan : पत्रात आपल्या भूमिकेचा बचाव करताना प्रधान यांनी म्हटले आहे की,.....
Dharmendra Pradhan : नीट-यूजी (NEET-UG) परीक्षेच्या निमित्ताने देशात निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवलेल्या आपल्या दोन पानांच्या राजीनामा पत्रात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनी सर्वांचे लक्ष वेधलं आहे. त्यांच्या या पत्रातील एका विधानाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. Dharmendra Pradhan resign neet controversy allegations

काय आहेत ते गंभीर आरोप?
पत्रात आपल्या भूमिकेचा बचाव करताना प्रधान यांनी म्हटले आहे की, नीट पेपरफुटीनंतर पहिल्या दिवसापासून मी याची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही काढता पाय घेतला नाही. परीक्षा माफियांमुळे एकाही गुणवंत विद्यार्थ्याचे भविष्य खराब होऊ देणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा माझा संकल्प होता.
परीक्षेचा गोंधळ मिटवून ती सुरळीत पार पाडण्यासाठी आणि परीक्षा माफियांच्या विरोधात आपण प्रामाणिकपणे पावले उचलली, असे त्यांनी यात स्पष्ट केले. मात्र, एका बाजूला आपण आणि सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी धडपडत असताना, दुसरीकडे स्वतःला 'जबाबदार पदावर' म्हणवून घेणाऱ्या काही व्यक्तींनीच विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्याचे आणि या प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचे प्रकार केले, असा अप्रत्यक्ष आणि गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून केला आहे.
नेमकं पत्रात काय म्हटले आहे धर्मेंद्र यांनी ?
माझ्या तरुण मित्रांनो,
मी गेल्या ४ दशकांपेक्षा अधिक काळापासून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण सुधारणेसाठी समर्पित राहिलो आहे. एक सशक्त, सर्वसमावेशक आणि दूरदृष्टी असलेली शिक्षण पद्धती हीच एका सशक्त राष्ट्राची पायाभरणी असते, यावर माझा सदैव विश्वास राहिला आहे. Dharmendra Pradhan
मी देशातील तरुणांच्या आकांक्षा, भावना आणि त्यांच्या रास्त अपेक्षांचा मनापासून आदर करतो. भारतातील युवा पिढीची स्वप्ने पूर्ण करणे हा आपल्या सर्वांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचा नैतिक संकल्प राहिला आहे. आदरणीय पंतप्रधानांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली राष्ट्राची सेवा करण्याची जी संधी मला मिळाली, त्याबद्दल मी मा. पंतप्रधानांचे आभार व्यक्त करतो.
परंतु ३ मे २०२६ रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत गैरप्रकार आढळले. भारत सरकारने याची त्वरित दखल घेत तपास सीबीआयकडे (CBI) सोपवला, परीक्षा रद्द केली आणि पुनर्रपरीक्षेची तारीख घोषित केली. यासोबतच पुढील वर्षापासून ही परीक्षा सीबीटी (Computer-based-test) मोडमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या काळात २० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीतपणे पार पडावी, ही आमची मुख्य प्राथमिकता होती. यासाठी ‘होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच’ (Whole of government approach) अंतर्गत काम करण्यात आले. यामध्ये भारत सरकारसोबतच राज्य सरकार आणि विशेषतः जिल्हा प्रशासनाची महत्त्वाची भूमिका राहिली. तसेच विद्यार्थी, पालक आणि माता-पिता यांच्या सहकार्याने २१ जून २०२६ रोजी ही परीक्षा पूर्ण झाली.
पहिल्याच दिवसापासून मी याची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीपासून कधीही काढता पाय घेतला नाही. परीक्षा माफियांमुळे एकाही गुणवंत विद्यार्थ्याचे भविष्य खराब होऊ देणार नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा माझा संकल्प होता.
१६ जुलै रोजी घोषित झालेले नीट-यूजीचे निकाल समाधानकारक राहिले, ज्यामध्ये गरीब पार्श्वभूमीतून आलेल्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनाही यश मिळाले.
परंतु या काळातही अनेक विद्यार्थ्यांना दिशाभूल करण्यासाठी जबाबदार पदांवर बसलेल्या व्यक्तींनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे मन अत्यंत व्यथित झाले. Dharmendra Pradhan resign
मी नेहमीच आपल्या लोकशाहीच्या ताकदीवर अढळ विश्वास ठेवणारा राहिलो आहे आणि तरुणांच्या आकांक्षा, स्वप्ने आणि अपेक्षांचा मनापासून आदर करत आलो आहे. ते केवळ भारताचे भविष्यच नाहीत, तर एका नव्या आणि विकसित भारताचे वाहक, निर्माते आणि भविष्याचे शिल्पकारही आहेत.
गेल्या १० दिवसांतील घडामोडी पाहून माझे मन दुःखी झाले आहे. हा माझ्यासाठी वैयक्तिक प्रतिष्ठेचा विषय नाही. Dharmendra Pradhan
भारताची युवाशक्तीच या देशाची खरी ताकद आहे.
देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रात अडकू देणार नाही, हाच माझा संकल्प आहे.
जंतर-मंतरवर आणि देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिचा राष्ट्रविरोधी शक्तींनी गैरफायदा घेऊ नये, देशाची एकता कायम राहावी, भारतातील एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये, आपल्या मुलांनी त्यांचा वेळ अभ्यासात घालवावा आणि करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावे, याच गोष्टीचा विचार करून मी माझा राजीनामा माननीय पंतप्रधानांकडे पाठवला आहे.
मी आदरणीय पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाबद्दल, विश्वासाबद्दल आणि निरंतर सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचप्रमाणे, मंत्रिमंडळातील माझे सर्व सन्माननीय सहकारी, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी आणि ज्यांच्यासोबत मला काम करण्याचे भाग्य लाभले त्या सर्व व्यक्तींचेही मी आभार मानतो. राष्ट्रसेवा ही माझ्या आयुष्याची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी यासाठी सदैव समर्पित राहीन.
प्रभू श्री जगन्नाथांच्या आशीर्वादाने मी भविष्यातही भारतमाता, ओडिशातील जनता आणि देशातील तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी स्वतःला समर्पित ठेवीन. Dharmendra Pradhan
आपला,
धर्मेंद्र प्रधान
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
