Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यानिमित्त जादा बसेसचे नियोजन
Ashadhi Wari 2026 : पुणे, महाराष्ट्र मिरर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ('पीएमपीएमएल') नेहमी
2 मिनट पठन

Ashadhi Wari 2026 : दररोज एकूण १७९ बसेस संचलनात राहणार
Ashadhi Wari 2026 : पुणे, महाराष्ट्र मिरर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ('पीएमपीएमएल') नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून दरवर्षीप्रमाणे यंदाही नियोजन करण्यात आलेले आहे. ( Ashadhi Wari 2026 pmpml extra buses palkhi sohala )
भाविक नागरिकांच्या सोयीसाठी दि. ५ जुलैपासून दि. ९ जुलैपर्यंत आळंदीकरिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सध्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकूण १७९ बसेस संचलनात राहणार आहेत. श्री क्षेत्र आळंदीकरिता दि. ८ जुलैरोजी रात्री १२:०० पर्यंत बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
याशिवाय दि. ५ जुलैपासून दि. ९ जुलैपर्यंत देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून नियमितपणे संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकूण ३१ बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १५ बसेसची व्यवस्था करण्यात आनेनी आहे. ( Ashadhi Wari 2026 )
दि. ९ जुलै रोजी आळंदी येथून पालखीचे प्रस्थान होत असल्यामुळे पहाटे ०२:३० पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून आळंदीला जाण्याकरिता जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ( Ashadhi Wari 2026 )
या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी ०५:३० वाजल्यापासून पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील बसस्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील १५० बसेस आळंदीसाठी भोसरी, विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासीसंख्या किमान ४० आवश्यक) करण्यात येणार आहे. ( Ashadhi Wari 2026 )
तसेच पुण्याहून दोन्ही पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेस दि. ११ जुलै रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२:०० ते ०१:०० दरम्यान चालविण्यात येणार असल्याने त्या वेळेत महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढाव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ( Ashadhi Wari 2026 )
तदनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रस्त्याने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरुळी कांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतूक सुरू ठेवण्यात येईल.
हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णतः बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गाची बसवाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाटऐवजी बोपदेव घाट मार्ग अशी चालू ठेवण्यात येणार असून, सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून, अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
तरी सादर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे. ( Ashadhi Wari 2026 )
Eknath Shinde hospitalized : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
Pune News : पीएमसीची १५ खाजगी रुग्णालयांना नोटीस; उपचारांचे दरपत्रक लपवणे पडले महागात
Pune News: हडपसर-दिवेघाट मार्ग आज दुपारी दोन तास पूर्णपणे बंद
