छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का; मंत्री अब्दुल सताऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रतापसिंह पाटील यांचा विजय जवळजवळ निश्चित
•महायुतीतील बंडखोरी आणि अंतर्गत समीकरणांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बाजी; अब्दुल सत्तार ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
1 मिनट पठन

•महायुतीतील बंडखोरी आणि अंतर्गत समीकरणांमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बाजी; अब्दुल सत्तार ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
छत्रपती संभाजीनगर :- विधानपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीत छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांची विजयाची घोडदौड अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या निवडणुकीत महायुतीचे व अजित पवार गटाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना मागे टाकत प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी घेतली असून त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीमध्ये शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे.
अब्दुल सताऱ्यांचे समर्थन ठरले निर्णायक?
महायुतीमध्ये असतानाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी अंतर्गत पातळीवर दिलेल्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे बोलले जात आहे. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या समर्थनाचे बॅनर आणि पोस्टर्स झळकावत त्यांना 'किंगमेकर' असे संबोधले आहे. महायुतीची सत्ता असताना आणि मित्रपक्षाचे उमेदवार रिंगणात असताना सत्तार यांच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, या विजयामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
