हॅलो…मुंबईच्या ताज हॉटेल आणि विमानतळावर बॉम्ब आहे, असे बोलून कॉलरने फोन कट केला, पुढे काय झाले?
Mumbai Bomb Threat News : काही दिवसांपूर्वी मुंबईत बेस्टच्या बसेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. त्यातून मुंबई पोलिसही सावरले नव्हते, तेव्हा पुन्हा एकदा मुंबई पोलिसांना बॉम्बचा फोन आला.
मुंबई :- धमकीचा फोन आल्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण Mumbai Police Control Center कक्षात गोंधळ उडाला. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबईतील प्रतिष्ठित ताज हॉटेल Taj Hotel आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावर International Airport बॉम्ब ठेवल्याचे Bomb Planted सांगितले. कॉल करणाऱ्या व्यक्तीने लगेच कॉल डिस्कनेक्ट केला. सोमवारी दुपारी हा फोन आला. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत दोन्ही ठिकाणी शोध घेतला. Mumbai Bomb Threat News
मुंबई पोलिसांना त्यांच्या झडतीत काहीही संशयास्पद आढळले नाही. हा फोन उत्तर प्रदेशातून आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता पोलिस फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईतील बेस्ट बसबाबत धमकीचा फोन आला होता, मात्र या वेळीही ती अफवा असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि मुंबईत अशा अफवा पसरवल्या जात आहेत. Mumbai Bomb Threat News
Web Title : Hello…caller hangs up saying there is a bomb at Taj hotel and airport in Mumbai, what happened next?