Hadapsar Vidhansabha | हडपसरचा ईतिहास दुसरी टर्म ‘नो चान्स’ ! शिवरकर, बाबर, टिळेकर.. ?
- स्थानिक गटबाजी आणि पुढील टर्मसाठी ‘फिल्डिंग’?
पुणे, दि. १४ नोव्हेंबर, महाराष्ट्र मिरर : Hadapsar Vidhansabha
पुणे शहराचे पूर्व द्वार असणारा हडपसर मतदारसंघ नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. हडपसरच्या इतिहासात सलग दोन टर्म आमदार होण्याची किमया कोणालाही साधता आली नाही. हडपसरमध्ये दुसरी टर्म ‘नो चान्स’ असाच पायंडा येथील मतदारांनी कायम ठेवला आहे. यंदा विद्यमान आमदार हा पायंडा मोडणार का ? इतिहासाची पुनरावृत्ती होणार? याचीच खमंग चर्चा मतदार संघात सुरु आहे. Hadapsar Vidhansabha
हडपसर मतदार संघात असणारी अंतर्गत गटबाजी आणि पुढील टर्मसाठी लावण्यात येणारी फिल्डिंग यामुळे नेहमीच विद्यमान आमदार पराभूत झाले आहेत. हडपसर मतदार संघातील मतदार नेहमीच बदल करत राहिला आहे.
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे प्राबल्य मोडून सन २००९ सार्वत्रिक निवडणुकीत हडपसर मतदार संघात शिवसेनेचे महादेव बाबर यांनी विजयश्री मिळवली होती. यानंतर २०१४ साली विधानसभा निवडणुकीत आमदार बाबर यांना पराभूत करून भाजपचे योगेश टिळेकर विधानसभेत पोहचले होते. यानंतर सन २०१९ विधानसभा निवडणुकीत आमदार योगेश टिळेकर यांना पराभवाचा धक्का देत राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांनी आमदारकी मिळवली होती. आता राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे महाआघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप जोमात असल्याने इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? आमदार तुपे गड राखणार याची तुफान चर्चा रंगली आहे. Hadapsar Vidhansabha
हडपसर मतदार संघात कोंढवा, कात्रज, वानवडी, मांजरी हा भाग महत्वाचा… माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, वसंत मोरे, आबा तुपे, योगेश ससाणे, संजय (तात्या) घुले, आशिष आल्हाट, सुधीर बधे, मुस्लिम नेते फारूकभाई इनामदार, मोहसीन शेख, अनिस सुडके, हाजी गफूर शेख, हसीना इनामदार, इम्तियाज मोमीन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.