क्राईम न्यूजनाशिकपुणे

Hadapsar Car bazar Robbery | हडपसर कार बाजार फोडून दोन कार चोरणारा पवन आलकुंटे जेरबंद

पुणे, दि. ४ एप्रिल, महाराष्ट्र मिरर : Hadapsar Car bazar Robbery |

रात्री अंधाराचा फायदा घेत हडपसर येथील प्रसिद्ध कार बाजार फोडून दोन महागड्या चारचाकी चोरणारा चोरटा गुन्हे शाखेच्या युनिट-५ कडून जेरबंद करण्यात आला आहे. Pune Police पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सपोआ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-५ वपोनि काईगडे व त्यांच्या पथकाने सदर कामगिरी केली आहे. Hadapsar Car bazar Robbery

या कारवाईत आरोपी पवन शंकर आलकुंटे, वय – २० वर्ष, रा. शंकर मठ, हडपसर व त्याचा अल्पवयीन साथीदार चोरलेल्या गाडीसह ताब्यात घेण्यात आला. Hadapsar Car bazar Robbery

हडपसर परिसरातील प्रसिद्ध असलेले चिंतामणी कार बाजार येथे दि. ३१ मार्च रोजी रात्री दोन कार चोरीस गेल्या होत्या. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना युनिट -५ कडील पोलीस अंमलदार अमित कांबळे यांना माहिती मिळाली कि, एक इसम वाहनांच्या नंबर प्लेट काढून चोरलेल्या गाड्या वापरत आहे.

याबाबत माहिती मिळताच वपोनि काईगडे यांनी यवत ते पुणे या मार्गावर नाकाबंदी लावण्यासाठी सूचना दिल्या. यवत येथून पुण्याच्या दिशेने येताना आरोपी पवन शंकर आलकुंटे, रा. शंकर मठ, हडपसर व त्याचा अल्पवयीन साथीदार चोरलेल्या गाडीसह ताब्यात घेण्यात आला. आरोपी आलकुंटे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने मौजमजे करीत कार बाजार येथे चोरी केल्याचे सांगितले. पोलीस तपासात आरोपीकडून १० लाख रुपये किमतीच्या दोन कार जप्त करण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0