Sonam Wangchuk : वांगचुक यांची रुग्णालयातून सुटकेसाठी विनंती, तर दुसरीकडे….
Sonam Wangchuk : नीट (NEET) पेपरफुटी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनियमिततेच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन सोमवारी अधिकच आक्रमक झाले.
2 મિનિટ વાંચન

Sonam Wangchuk : मी आमरण उपोषण मागे घेण्यास आजच तयार, पण..
Sonam Wangchuk : नीट (NEET) पेपरफुटी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनियमिततेच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन सोमवारी अधिकच आक्रमक झाले. आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयातून मुक्त करण्याच्या मागणीसाठी त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (सीजेपी) 'संसद चलो' आंदोलनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. Sonam Wangchuk letter safdarjung hospital parliament
वांगचुक यांची रुग्णालयातून सुटकेसाठी विनंती
गेल्या २१ दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना १८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरून उचलून सफदरजंग रुग्णालयात हलवले. मात्र, वांगचुक यांनी रुग्णालयातूनच प्रशासनाला पत्र लिहून आपली प्रकृती उत्तम असल्याचे स्पष्ट केले आहे. "माझे सर्व वैद्यकीय अहवाल सामान्य आहेत. जर मला स्थानबद्ध केलेले नसेल, तर मग माझ्या हालचालींवर निर्बंध कशासाठी?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. Sonam Wangchuk

त्यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी ही 'अवैध नजरकैद' असल्याचे म्हणत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने यावर तातडीने सुनावणी घेण्याचे मान्य केले असले तरी, वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची त्यांची याचिका सध्यातरी फेटाळली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या मते, वांगचुक यांची प्रकृती स्थिर असली तरी रक्तातील घटकांमुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवणे गरजेचे आहे.
दरम्यान, या ट्विटपूर्वी त्यांनी आपले उपोषण मागे घेण्यासाठी केंद्र सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. यापैकी कोणतीही एक अट पूर्ण झाल्यास ते उपोषण सोडण्यास तयार आहेत.
PMC News : महापालिकेचे १० लाखांचे ‘फूड टेस्टिंग मशिन’ गायब; आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

हे सगळे मी मला अनधिकृत पद्धतीने ताब्यात ठेवण्यात आलेल्या सफदरगंज रुग्णालयातून सांगत आहे. याठिकाणी माझ्या हालचालींवर, बोलण्यावर आणि संपर्क साधण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत.
सीजेपीचा संसद मोर्चा आणि पोलिसांचा फौजफाटा
एकीकडे वांगचुक यांच्या अटकेचा मुद्दा तापला असताना, दुसरीकडे सीजेपीने संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 'संसद चलो' मोर्चाची घोषणा केली होती. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलक संसद मार्गाच्या दिशेने निघाले असता, त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोठी नाकेबंदी केली होती. संसद मार्गावर भक्कम बॅरिकेड्स वेल्डिंग करून उभे करण्यात आले होते. या दरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे आंदोलक आणि प्रशासन यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. Sonam Wangchuk

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या लाठीचार्जचा निषेध केला. "आम्ही लाखो मुलांच्या भविष्याबद्दल बोलत आहोत आणि सरकार त्यांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करत आहे," असा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. सीजेपीच्या या आंदोलनाला आम आदमी पक्षासह विविध विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे.
Katraj-Kondhwa Road : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाची मुदत पुन्हा लांबणीवर
सध्या सफदरजंग रुग्णालयाबाहेर आणि संसद मार्गावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात आहे. एकीकडे वैद्यकीय कारणांचे सबब देऊन वांगचुक यांना रोखून धरले जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे, तर दुसरीकडे 'शांती आणि सुव्यवस्था' राखण्याच्या नावाखाली प्रशासनाने आंदोलकांची कोंडी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
