મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Rain Update : 'घराबाहेर पडू नका, ६ तारखेपर्यंतचे अलर्ट गांभीर्याने घ्या'

मुंबई, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

3 મિનિટ વાંચન

Rain Update

Rain Update : ६ तारखेपर्यंत 'रेड अलर्ट'; मुख्यमंत्र्यांचे जनतेला तातडीचे आवाहन

मुंबई, महाराष्ट्र मिरर

Rain Update : मुंबई, ठाणे, पालघर आणि पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा हाहाकार पाहायला मिळत असून, गुरुवारपासून पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. ( Rain Update ) शनिवारीही पावसाची संततधार कायम राहिल्याने राज्य शासनाने आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी शनिवार आणि रविवारी अत्यंत मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' घोषित केला आहे. (rain update cm fadnavis red alert)

या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला तातडीचे आवाहन केले असून, ६ तारखेपर्यंत प्रशासनाने दिलेले सर्व इशारे नागरिकांनी गांभीर्याने पाळावेत आणि विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट केले आहे. ( Rain update)

हेही वाचा: Pune News : पीएमसीची १५ खाजगी रुग्णालयांना नोटीस; उपचारांचे दरपत्रक लपवणे पडले महागात

दर तीन तासांनी SMS द्वारे मिळणार अलर्ट

राज्यातील पावसाच्या सद्यस्थितीबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "राज्यासह मुंबई महानगर, ठाणे, रायगड, पालघर आणि पुणे-नाशिक जिल्ह्यांच्या काही भागांत सरासरीपेक्षा कितीतरी अधिक पाऊस होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ६ तारखेपर्यंत या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. ( Rain Update ) या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून, मुसळधार पाऊस असलेल्या बाधित क्षेत्रांतील नागरिकांना दर तीन तासांनी एसएमएस (SMS) द्वारे अलर्ट पाठवले जात आहेत. नागरिकांनी या सुचनांकडे दुर्लक्ष करू नये."

Pune FDA : लेबल नसलेले तूप व नमकीन जप्त
संभाव्य अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारी अनेक भागांतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी पुढे बोलताना सांगितले की, "पावसामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास पूर्णपणे टाळावा. अत्यंत आवश्यक काम असेल तरच आणि प्रशासनाचा अधिकृत अंदाज पाहूनच घराबाहेर पडावे."

आपत्कालीन यंत्रणा २४ तास तैनात

राज्यातील पूरपरिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल , राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवून आहेत. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचत आहे किंवा सखल भागांत नागरिकांना अडचणी येत आहेत, तिथे तातडीने मदत पोहोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व नियंत्रण कक्ष परस्परांच्या संपर्कात असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ( Rain Update )


Sinhgad Institute : गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत २७ शिक्षकांचे तब्बल ५ कोटी ६ लाख रुपयांचे वेतन थकवल्याचा प्रकार

पुण्याच्या घाटमाथ्यावर 'रेड अलर्ट'

दुसरीकडे, पुणे जिल्हा आणि शहरातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक सक्रिय झाले असून, त्याचा थेट परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर, विशेषतः पुणे जिल्ह्यावर होत आहे.

पुणे शहरात सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असला, तरी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. घाटमाथ्यावरील काही दुर्गम भागांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणेकरांना किंचित दिलासा

पुणे शहराला सध्या पाणीटंचाईमुळे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत पाव ते अर्ध्या टीएमसी पाण्याची नवीन आवक झाली आहे. या धरणसाखळीत वरसगाव, टेमघर, पानशेत आणि खडकवासला या चार प्रमुख धरणांचा समावेश होतो. ( Rain Update ) या पावसाने धरणातील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार असल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, नागरिकांनी नदीपात्राजवळ किंवा पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

प्रशासनाचे नागरिकांना महत्त्वाचे निर्देश

शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असले तरी पर्यटनस्थळे, धबधबे आणि घाटांमधील प्रवास पूर्णपणे टाळा.

सोशल मीडियावरील कोणत्याही अपुऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता, केवळ शासकीय नियंत्रण कक्ष आणि हवामान खात्याच्या अधिकृत इशाऱ्यांचे पालन करा.

पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीच्या भागात वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्याने मोबाईल आणि पॉवर बँक चार्ज ठेवा, जेणेकरून आपत्कालीन संदेश (SMS) वेळेत मिळतील.

वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने जुन्या इमारती, झाडे आणि विजेच्या खांबांखाली उभे राहू नका.

पुढील ७२ तास संपूर्ण राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, प्रशासनाने दिलेले 'रेड अलर्ट' गांभीर्याने घेऊन नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगावी, असे आवाहन राज्य शासनातर्फे करण्यात आले आहे. ( Rain Update )

https://www.instagram.com/p/DaXewCVtpXA

શેર કરો