મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune : 'देवाभाऊंचा निरोप'च्या नावाखाली पुण्यात सुरू आहे कोट्यावधींची लूट

पुणे, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

3 મિનિટ વાંચન

Pune

Pune : पुणे महानगरपालिकेतील कथित ९६७ कोटींच्या कचरा निविदा घोटाळ्याप्रकरणी संघचालकांना साकडे: विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांचा गंभीर आरोप

पुणे, महाराष्ट्र मिरर

Pune : पुणे महानगरपालिकेच्या (PMC) घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत संमिश्र कचरा प्रक्रिया पद्धतीमुळे 'भूमिग्रीन' कंपनीला मिळणाऱ्या तब्बल ९६७ कोटी रुपयांच्या वादग्रस्त निविदेवरून राजकीय वर्तुळात तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. जर ओला व सुका कचऱ्याच्या स्वतंत्र निविदा काढल्या असत्या, तर हेच काम अवघ्या ४०० कोटी रुपयांत पूर्ण होऊ शकले असते, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. या नियमबाह्य कारभारामुळे पुणेकरांच्या करातील कोट्यवधी रुपयांचा निधी अनावश्यकपणे वाया जात असल्याचा गंभीर आरोप होत असतानाच, सत्ताधारी नेते मात्र या संपूर्ण प्रकरणावर मूग गिळून गप्पा बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. pune waste tender scam pmc congress

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या कारभारात सुरू असलेला कथित भ्रष्टाचार, नियमबाह्य निविदा प्रक्रिया आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे गटनेते तथा पालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना एक पत्र लिहून लक्ष वेधले आहे. पुण्यातील कचरा व्यवस्थापन विभागाच्या सुमारे ९६७ कोटी रुपयांच्या निविदेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी या पत्रामध्ये केला आहे. तसेच, 'देवाभाऊंचा निरोप'च्या नावाखाली पुण्यात कोट्यावधींची लूट सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. Pune

'देवाभाऊंचा निरोप' हा भ्रष्टाचाराचा कोडवर्ड?

पुण्यातील विविध राजकीय कारभारी प्रत्येक निर्णयामागे "मुंबईतील देवाभाऊंचा निरोप आहे" असा धाक दाखवून मनमानी करत असल्याचा घणाघाती आरोप अरविंद शिंदे यांनी केला आहे. "आता 'देवाभाऊंना साकडे' घालण्याऐवजी संघाच्या नैतिक भूमिकेला साद घालण्याची वेळ आली आहे," असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

PMC News : गृहप्रकल्पांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित विकसकांचीच

रस्ते खड्ड्यात जाणे, नदी सुधारणा प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये वाया जाणे, आणि २४ तास पाणी योजनेचे पाणी केवळ ठेकेदारांपर्यंत पोहोचणे, या सर्व बाबींसाठी हाच कथित पासवर्ड वापरला जात असल्याचा दावा पत्रात केला आहे. pune

भूमिग्रीन कंपनीच्या निविदेत फेरफारचा गंभीर आरोप

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील निविदा क्रमांक ३/२०२६-२७ संदर्भात बोलताना शिंदे यांनी म्हटले आहे की, आमदार योगेश पुंडलिक टिळेकर यांचा वरदहस्त असलेल्या 'भूमिग्रीन' कंपनीला पात्र ठरवण्यासाठी निविदेतील अटी-शर्तीमध्ये जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. सुरवातीला हे काम साधारण ४०० कोटी रुपयांचे असताना, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५ (२) (२) चा आधार घेत कोणतीही स्पर्धात्मक निविदा न काढता ते ७०० कोटींपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला होता.

MHT-CET : भाजप नगरसेवकाच्या जुळ्या मुलांना ९९ टक्के, चौकशीची मागणी

काँग्रेस पक्षाच्या तीव्र विरोधामुळे तो प्रस्ताव मागे पडला, मात्र त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा मागवून आणि पालिकेच्या दक्षता विभागाचे सर्व आक्षेप धुडकावून ती प्रक्रिया पूर्ण केली गेली. मूळचा ४०० कोटींचा अंदाज असलेला हा प्रकल्प आता तब्बल ९६७ कोटी रुपयांवर पोहोचला असून, यामुळे पुणेकरांच्या करातून गोळा झालेल्या सार्वजनिक निधीवर ५६७ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणात भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, महापौर मंजुषा दीपक नागपूरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि सभागृह नेते गणेश बिडकर यांची भूमिका संशयास्पद आणि मौन बाळगणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संघाच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या नेत्यांनी या आर्थिक लूट प्रकरणावर डोळे झाक केल्यामुळे पुणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार मेधा कुलकर्णी यांना शहरातील मुख्य राजकारणापासून बाजूला ठेवले जात असून, ते केवळ उद्घाटनांपुरते मर्यादित असल्याचे दिसून येत आहे. pune

RMC : पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेश; कॅमेरा, मद्यतपासणीसह कडक सुरक्षा नियम

पेशव्यांच्या काळातील लुटीची आठवण

पुण्यातील या अभूतपूर्व आर्थिक उधळपट्टीमुळे पेशवाईच्या काळात निजामाने किंवा दुसऱ्या बाजीरावाच्या काळात इंग्रजांनी केलेल्या पुण्याच्या लुटीची आठवण व्हावी, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. "ना खाउंगा ना खाने दूंगा" या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेचा उलटा अर्थ काढून सुरू असलेला हा सावळागोंधळ थांबवावा, अशी विनंती त्यांनी सरसंघचालकांना केली आहे. संघाच्या विचारसरणीचा हवाला देऊन सत्तेत आलेल्या कार्यकर्त्यांनी जर नैतिकतेचा बळी दिला, तर ती केवळ व्यक्तींची नव्हे तर मूल्यव्यवस्थेची अधोगती ठरेल, असे सांगत एक सामान्य पुणेकर म्हणून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती अरविंद शिंदे यांनी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો