Pune Police: जखमी तक्रारदारांना आता स्वतः रुग्णालयात नेणार पोलीस
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

Pune Police : उपचाराविना तक्रारदारांना परत पाठवणाऱ्या पोलिसांना चाप; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा महत्त्वपूर्ण आदेश
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Police : पोलिसांच्या कार्यपद्धतीत एक महत्त्वपूर्ण आणि संवेदनशीलता वाढवणारा बदल करण्यात आला आहे. आता पोलीस ठाण्यात तक्रार किंवा मदतीसाठी येणाऱ्या जखमी व्यक्तीला केवळ मेडिकल चिठ्ठी (यादी) देऊन उपचारासाठी शासकीय रुग्णालयात एकट्याने पाठवण्याची जुनी पद्धत बंद होणार असून, यापुढे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी किंवा अंमलदार स्वतः त्या जखमी व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाऊन उपचाराची पूर्तता करणार आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे सक्त निर्देश जारी केले आहेत. pune police injured complainants hospital

पोलिसांच्या निदर्शनास आले होते की, मारहाण किंवा हल्ल्यात जखमी झालेले नागरिक जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येतात, तेव्हा बहुतांश वेळा पोलीस त्यांना केवळ रुग्णालयाची चिठ्ठी हातात देऊन उपचारासाठी पाठवून देत असत. अनेकदा जखमी व्यक्ती प्राथमिक उपचारानंतर दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे पोलीस ठाण्यात पुन्हा फिरकतच नाही. pune police

तक्रारदार आणि वैद्यकीय कागदपत्रांचा पाठपुरावा न झाल्यास गुन्ह्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही. परिणामी, निष्पाप जखमी व्यक्तीवर हल्ला किंवा मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात अडथळा निर्माण होतो. pune police injured complainants hospital
Rain Update: खडकवासला धरणसाखळीत ८७ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; मुठा नदीतील विसर्ग बंद
पोलीस आयुक्तांच्या नव्या आदेशानुसार खालील मुद्द्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलीस ठाणे किंवा पोलीस चौकीमध्ये कोणताही जखमी नागरिक मदतीसाठी किंवा तक्रारीसाठी आल्यास, त्याला परस्पर रुग्णालयात जाण्यास सांगणे बंद केले जाईल. कर्तव्यावरील पोलीस अधिकारी किंवा अंमलदाराने स्वतः त्या जखमी व्यक्तीसोबत रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी आणि उपचाराची प्रक्रिया पूर्ण करून घेणे आवश्यक राहील. रुग्णालयात उपचार व तपासणी झाल्यानंतर पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई तातडीने हाती घेतली जाईल.

या आदेशाची कोणतीही हयगय न करता अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी (Senior Inspectors) आपल्या अधिपत्याखालील सर्व अंमलदार व अधिकाऱ्यांकडून या नियमांचे काटेकोर पालन होत असल्याची खात्री करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पोलिसांच्या या नव्या पावित्र्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसेल आणि गुन्ह्यातील जखमींना न्याय मिळवून देणे अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Pune police
Robbery Case: १ कोटींच्या दरोडा प्रकरणात पत्रकार आशिष तिवारी अटकेत
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
