PUNE NEWS: राष्ट्रवादीमधील राजकीय नाराजीनाट्यावर पडदा
प्रबळ इच्छुक सुनील टिंगरे यांनी अखेर माघार
1 મિનિટ વાંચન

प्रबळ इच्छुक सुनील टिंगरे यांनी अखेर माघार
निलेश राऊत
पुणे: विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरू असलेल्या राजकीय नाराजीनाट्यावर मंगळवारी पडदा पडला. विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरला असून, माजी आमदार आणि प्रबळ इच्छुक सुनील टिंगरे यांनी अखेर माघार घेतली आहे.PUNE NEWS

मंगळवारपासून चार जूनपर्यंत अर्ज मागे घेण्यास मुदत आहे. महायुतीचे उमेदवार विक्रम काकडे यांच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाने त्यांनी मिळकतकर भरला नसल्याचा आक्षेप घेतला. मात्र, त्याचे काकडेंनी निरसन केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला. त्यानंतर टिंगरे यांची माघार घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच पार्थ पवार यांनी समजूत काढत भविष्यात संधी देण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.PUNE NEWS
मात्र, बंडखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केलेल्या प्रदीप कंद यांनी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, महायुतीचे उमेदवार काकडेच असल्याचे स्पष्ट केल्याने कंद यांच्या पारड्यात काय पडणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
PUNE NEWS
