Pune Metro : हिंजवडी मेट्रोचा १५ जुलैचाही मुहूर्त हुकणार
पुणे, महाराष्ट्र मिरर
3 મિનિટ વાંચન

Pune Metro : सुरक्षा प्रमाणपत्र रखडल्याने हिंजवडी मेट्रोची पाचवी डेडलाईनही हुकली
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Metro : पुणेकरांच्या, विशेषतः आयटी क्षेत्रातील नोकरदारांच्या पदरी पुन्हा एकदा घोर निराशा पडणार आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या अत्यंत महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गावरील पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याचे स्पष्ट संकेत आहेत. येत्या १५ जुलै रोजी या मार्गावर मेट्रो धावेल, असे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने केले होते. ( pune metro hinjewadi shivajinagar delayed )
मात्र, मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) अंतिम सुरक्षा प्रमाणपत्र अद्याप रखडल्यामुळे हा हक्काचा मुहूर्तही हुकणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ च्या संथ आणि ढिसाळ कारभारामुळे हिंजवडीतील तब्बल दहा लाख आयटीयन्सच्या संयमाची परीक्षा पाहिली जात असून, प्रवाशांमध्ये आता तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ( Pune Metro )
Jejuri Accident : ‘मदतीची घोषणा केवळ कागदावरच?’, रोहित पवारांचा सरकारवर थेट निशाणा
माण ते बालेवाडी दरम्यानच्या बारा स्थानकांच्या पहिल्या टप्प्याची प्रत्यक्ष सुरक्षा तपासणी ‘सीएमआरएस’कडून नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, जोपर्यंत सुरक्षा आयुक्त आपला अंतिम अहवाल आणि व्यावसायिक वाहतुकीसाठीचे सुरक्षा प्रमाणपत्र सुपूर्द करत नाहीत, तोपर्यंत या मार्गावर प्रवासी सेवा सुरू करता येणार नाही.
‘पीएमआरडीए’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमआरएसचा अहवाल हाती आल्यानंतरही प्रत्यक्ष मेट्रो धावण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील तांत्रिक आणि प्रशासकीय सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतील. यावरून जुलैअखेर किंवा थेट ऑगस्ट उजाडल्याशिवाय मेट्रो सुरू होणे आता निव्वळ अशक्यप्राय दिसत आहे. ( Pune Metro )

मुख्यमंत्र्यांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता
विशेष म्हणजे, ‘पीएमआरडीए’चे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी विकासक कंपनी ‘PITCMRL’ला वारंवार कडक शब्दांत तंबी दिली होती. तरीही मेट्रो सेवा सुरू होण्यास होत असलेला हा विलंब थेट प्रशासकीय समन्वयाच्या अभावावर बोट ठेवणारा आहे. ( Pune Metro )
Crime News : Man Brutally Murdered Under Dhankawadi Flyover ; Suspect Arrested
पाचव्यांदा हुकली डेडलाईन ; प्रकल्प ‘फेज रोलआऊट’मध्येही अपयशी
२३ किलोमीटरच्या या संपूर्ण कॉरिडॉरसाठी पीएमआरडीएने आतापर्यंत तब्बल पाच वेळा अंतिम मुदत (डेडलाईन) बदलली आहे. सुरुवातीला संपूर्ण मार्ग एकाच वेळी सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र, काम वेळेत पूर्ण होत नसल्याचे पाहून राज्य सरकारने मार्च महिन्यात धोरणात्मक बदल करत ‘फेज रोलआऊट’ (टप्प्याटप्प्याने मार्ग सुरू करणे) करण्याचा निर्णय घेतला.
Pune Murder : पुण्यातील धनकवडीत मद्यपानाच्या वादातून निर्घृण खून

A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
या नवीन निर्णयानुसार:
पहिला टप्पा (माण ते बालेवाडी - १२ स्थानके) - १५ जुलैपर्यंत सुरू करण्याचे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
दुसरा टप्पा (उर्वरित ११ स्थानके) - पहिल्या टप्प्यानंतर सुरू करण्याचे ठरले होते.
यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा जुलैमध्ये सुरू होईल, अशी अधिकृत घोषणा केली होती. नंतर मे महिन्याची मुदत जूनअखेरपर्यंत आणि पुढे १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. मे महिन्यापासून जून आणि आता थेट जुलै उजाडला, तरी तांत्रिक आणि सुरक्षा मंजुरीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला ‘पुणे आयटी सिटी मेट्रो’ने एकप्रकारे केराची टोपली दाखवल्याची चर्चा राजकीय व सामाजिक वर्तुळात रंगली आहे. ( Pune Metro )

मुहूर्ताची मुहुर्तमेढ होईना
पहिली मुदत: मे २०२६ (हुकली)
दुसरी मुदत: जूनअखेर (हुकली)
तिसरी मुदत: १५ जुलै (हुकण्याची दाट शक्यता)
अडचण कुठे? ‘CMRS’ (मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त) यांच्या अंतिम मंजुरी अहवालाची प्रतीक्षा.
पुढील काळ: अहवाल आल्यानंतरही तांत्रिक प्रक्रियेसाठी किमान पंधरा दिवस लागणार. ( Pune Metro )
Rohit Pawar : Is Financial Aid Only on Paper? Rohit Pawar Directly Targets Government
मेट्रो फक्त वेगाने धावून चालत नाही, तर ती प्रवाशांच्या खऱ्या सोयीसाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी धावली पाहिजे. पायाभूत सुविधा भक्कम आणि पार्किंगची योग्य सोय नसेल, तर प्रवासाचा वेग वाढूनही सर्वसामान्यांचा मनस्ताप कमी होणार नाही. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकणाऱ्या आयटी कर्मचाऱ्याला मेट्रोकडून अपेक्षा फक्त प्रवासाची नाही, तर स्टेशनवर पोहोचल्यापासून ते ऑफिसमध्ये जाईपर्यंतच्या सुलभतेची आहे. योग्य नियोजन आणि ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ हेच या प्रकल्पाच्या यशाचे गमक आहे!”
— प्रशांत पंडित, सरचिटणीस, फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज युनियन
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
