મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PUNE CRIME : कात्रजमध्ये ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

कात्रजमध्ये ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

પક
પ્રતિક્ષા કાટે

2 મિનિટ વાંચન

PUNE CRIME : कात्रजमध्ये ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त

PUNE CRIME : कात्रजमध्ये ५.७९ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; आरोपी प्रशांत सावंतची पोलिस कोठडी १८ जुलैपर्यंत वाढ

PUNE CRIME : पुण्यातील कात्रज परिसरात तब्बल ५ कोटी ७९ लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी प्रशांत सुरेश सावंत (वय ३८, रा. येरवडा) याची पोलिस कोठडी १८ जुलैपर्यंत वाढवली आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय तसेच संभाव्य आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीचे धागेदोरे समोर येत असल्याने पुणे पोलिसांनी तपासाची व्याप्ती दिल्ली आणि बंगळुरूपर्यंत वाढवली आहे.(PUNE CRIME)

Pmc Politics : भाजप-राष्ट्रवादी युतीची दाट शक्यता

पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दिल्लीहून मेफेड्रॉन आणले होते. 'बेनी' नावाच्या एका नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हे अमली पदार्थ बंगळुरूला पोहोचविण्याची तयारी सुरू होती. या व्यवहारामागे मोठे ड्रग्ज नेटवर्क कार्यरत असल्याचा संशय असून, त्याचा छडा लावण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

प्रशांत सावंतला ८ जुलै रोजी कात्रज चौकातील आयसीआयसीआय बँकेसमोरील नव्या उड्डाणपुलाखाली सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ किलो ८९५ ग्रॅम मेफेड्रॉन, एक मोबाईल फोन आणि सफारी कपड्यांची बॅग जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या अमली पदार्थाची अंदाजे बाजारभावानुसार किंमत ५.७९ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) आणि २२(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (PUNE CRIME)

Moshi Garbage Depot : एएलआर कंपनीच्या प्रोजेक्ट हेड आणि सेफ्टी ऑफिसरला अटक

गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथक-१ चे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक योगेश कोतकर यांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. सरकारी पक्षातर्फे अॅड. अमर पंढरीनाथ ननावरे यांनी युक्तिवाद करत आरोपीला आणखी पोलिस कोठडीत ठेवण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी वाढवली. (PUNE CRIME)

पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, पुणे ते दिल्ली हे सुमारे १,३०० किलोमीटरचे अंतर असल्यामुळे यापूर्वीच्या कोठडीत आवश्यक तपास पूर्ण करणे शक्य झाले नाही. आरोपीला सोबत घेऊन दिल्ली आणि बंगळुरू येथे तपास केल्यास ड्रग्ज पुरवठा साखळीतील इतर संशयितांची ओळख पटविणे, आर्थिक व्यवहारांची माहिती मिळविणे आणि आंतरराज्यीय नेटवर्क उघड करण्यास मदत होणार आहे.(PUNE CRIME)

तपासादरम्यान आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. बंगळुरूतील अमृताहल्ली पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. याशिवाय पुण्यातील येरवडा, विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलिस ठाण्यांमध्ये आर्म्स अॅक्ट, जबरी चोरी, गंभीर दुखापत यांसह एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. (PUNE CRIME)

Maharera : बिल्डर नागपाल यांना दणका: १ कोटी रुपये व्याजासह परत करण्याचे आदेश

या प्रकरणातील तपास सध्या निर्णायक टप्प्यात असून, दिल्ली, बंगळुरू आणि पुणे यांदरम्यान कार्यरत असलेल्या संभाव्य ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. पोलिसांकडून डिजिटल पुरावे, मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि इतर संशयितांच्या हालचालींचा बारकाईने तपास सुरू असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता आहे.

(PUNE CRIME)

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો