મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune :धनकवडीत भारती हॉस्पिटलच्या आवारातील सीमाभिंत कोसळली; ५० दुचाकी अडकल्या

धनकवडी येथील भारती हॉस्पिटलच्या आवारातील मोठी सीमाभिंत शनिवारी अचानक कोसळली.

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

1 મિનિટ વાંચન

Pune

Pune : धनकवडी येथील भारती हॉस्पिटलच्या आवारातील मोठी सीमाभिंत शनिवारी अचानक कोसळली.


धनकवडी येथील भारती हॉस्पिटलच्या आवारातील मोठी सीमाभिंत शनिवारी अचानक कोसळली. या दुर्घटनेत भिंतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे ४० ते ५० दुचाकी वाहने अडकली आहेत. घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून दुचाकी बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. Pune  Bharati Hospital Wall Collapses Dhankawadi

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Kodre Farms : कृषी जमिनीवरील बेकायदा व्यावसायिक वापर महागात; कोद्रे फार्म्सवर एनजीटीचा १.३४ कोटींचा पर्यावरण दंड

अग्निशमन दलाच्या वसंत भिलारे अधिकाऱ्यांनी सांगितले की, "घटनेची माहिती मिळताच आमचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ढिगारा हटवून अडकलेली वाहने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परिसराची पाहणी करून पुढील सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात येतील."

दरम्यान, सततच्या पावसामुळे भिंत कमकुवत होऊन कोसळली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडून भिंतीच्या बांधकामाची स्थिती आणि दुर्घटनेची कारणे तपासली जाणार आहेत.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, "अचानक मोठा आवाज झाला आणि भिंत कोसळलेली दिसली. सुदैवाने त्या वेळी तिथे कोणी व्यक्ती नव्हती, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली."

PMC : ‘पुष्पा’ फेम वृक्ष अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; ५ लाखांची लाचखोरी अन्

घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे. Pune

શેર કરો