PMC : हडपसरमध्ये कचऱ्याच्या डंपरने घेतला तरुणाचा जीव
भानगिरेंचा संतप्त सवाल
3 મિનિટ વાંચન

PMC: महानगरपालिकेने नागरिकांचे जीव घेण्याचे कंत्राट ठेकेदारांना दिले आहे का?, शिवसेना नेते

भानगिरेंचा संतप्त सवाल
पुणे, महाराष्ट्र मिरर
PMC : हडपसर येथील काळेपडळ परिसरातील महापालिकेच्या कचरा डेपोत एका पालिकेच्याच कर्मचाऱ्यांचा दुर्देैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महापालिकेचे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी सुनील हनुमंत गुरव (वय २७) असे या मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून कचऱ्याच्या डंपरने त्याला चिरडल्याची माहिती समोर आली आहे. ३१ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या घटनेने पुणे महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापन आणि अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. तर दुसरीकडे हडपसरमधील मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास JSPM कॉलेज हांडेवाडी रोड, उरळी देवाची पुणे येथे महानगरपालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने बेदरकारपणे वाहन चालवत एका निरपराध तरुणाचा जीव घेतल्याची दुसरी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुनील गुरव हे हडपसर येथील काळेपडळ महापालिका कचरा डेपोत कंत्राटी तत्त्वावर स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ३१ ऑगस्टच्या रात्रीच्या सुमारास अंधार असताना, कचरा घेऊन डेपोच्या आवारात वेगात प्रवेश करणाऱ्या महापालिकेच्या कचऱ्याच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत गुरव गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे, अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने जखमी व्यक्तीला मदत करणे किंवा पोलिसांना कळवणे सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी कालेपडल पोलीस ठाण्यात पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. PMC
Pune News : अण्णा हजारेंची प्रकृती स्थिर; ताप-खोकल्यामुळे रुग्णालयात दाखल
या दुर्घटनेमुळे हडपसर आणि उरळी देवाची परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ, तीव्र संताप आणि प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जेएसपीएम कॉलेज, हांडेवाडी रोड आणि हडपसर परिसरातील रस्त्यांवर महापालिकेचे कचरा वाहून नेणारे डंपर आणि ट्रक अत्यंत भरधाव वेगाने, बेदरकारपणे आणि काही वेळा वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा उचलणारी हीच वाहने आता रस्त्यावर सामान्य नागरिकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी 'मृत्यूचे सापळे' बनल्याची चर्चा आहे. PMC

या घटनेनंतर शिवसेना पक्षाचे नेते व माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आक्षेप घेत धारेवर धरले आहे. "कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमुळेच जर नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल, तर महापालिका नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कधी घेणार? एका होतकरू तरुणाचा व कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्यानंतरही महापालिका प्रशासनाला जाग येणार नाही का?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. PMC

तसेच महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढत का रस्त्यावर धावणाऱ्या या कचरा डंपरचा नेमका वेग कोण तपासतो?
या वाहनांवर जीपीएस प्रणालीद्वारे अचूक निरीक्षण ठेवले जाते का? डंपर चालकांचे कायदेशीर प्रशिक्षण आणि त्यांचे वैध परवाने नियमित तपासले जातात का? कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांची 'फिटनेस' प्रमाणपत्रे तपासली जातात का? कंत्राटदारांना नियम पाळण्याच्या सूचना देऊन महापालिका स्वतः त्याची अंमलबजावणी तपासते का? की नागरिकांच्या जीवाची किंमत ठेकेदारांच्या नफ्यापेक्षा कमी झाली आहे? असे संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.
Pune Crime : पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील गोंधळ; अमित ठाकरेंसह पंचवीस जणांवर गुन्हा
ही दुर्घटना केवळ एका चौकशीपुरती मर्यादित न ठेवता पुणे महानगरपालिकेने तातडीने यात हलगर्जीपणा करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. संबंधित चालक आणि संबंधित ठेकेदाराची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर गुन्हेगारी गुन्हे दाखल करावेत, तसेच मृत तरुण सुनील गुरव यांच्या पीडित कुटुंबीयांना महापालिकेने तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी होत आहे. PMC
हडपसरसह संपूर्ण पुणे शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांचे तातडीने सर्वसमावेशक 'सुरक्षा ऑडिट' करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहनांची वेगमर्यादा, जीपीएस रेकॉर्ड, फिटनेस प्रमाणपत्रे, चालकांची पात्रता व त्यांची वैद्यकीय व मानसिक चाचणी यांची काटेकोर तपासणी करणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार? आणखी किती निरपराधांचे जीव गेल्यानंतर कारवाई होणार? नागरिकांना रस्त्यावर सुरक्षितपणे जगण्याचा आणि चालण्याचा अधिकार आहे की नाही, आणि नागरिकांचे जीव घेण्याचे हे हलगर्जीपणाचे कंत्राट ठेकेदारांना नेमके कोणी दिले, असे अनेक प्रश्न आता सुजाण नागरिकांमधून विचारले जात आहेत.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)
