મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PCMC : पिंपरी-चिंचवड शहराच्या मेट्रो डीपीआरमध्ये सुधारणा करा

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

1 મિનિટ વાંચન

PCMC

PCMC : शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करून महापौरांचे महामेट्रोला निर्देश

पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र मिरर

PCMC : पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील वाढ आणि विस्तार लक्षात घेऊन प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालात (DPR) आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) ला दिले आहेत. PCMC metro dpr ravi landge

शहराच्या सध्याच्या गरजांपुरते नियोजन न करता, पुढील अनेक दशकांचा विचार करून मेट्रो नेटवर्क विकसित करण्यावर त्यांनी भर दिला.

मेट्रो प्रकल्प हा भविष्यातील वाढत्या लोकसंख्येला आणि शहराच्या विस्ताराला पूरक ठरणारा असावा. नागरिकांच्या हिताचे रक्षण करणारे, सर्वसमावेशक आणि भविष्यासाठी सक्षम असे मेट्रो नेटवर्क उभारण्यासाठी डीपीआरमध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत, असे महापौरांनी सांगितले. pcmc

Pune Crime: आंदेकर टोळीतील गुंडांचा एसटी बॉईज टोळीकडून पाठलाग; कोर्टातून बाहेर पडल्यानंतर तणाव

या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, शंकर जगताप, उपमहापौर शर्मिला वावर, स्थायी समितीचे पदाधिकारी, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी तसेच पीसीएमसी आणि महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत महामेट्रोकडून प्रस्तावित मेट्रो विस्तार प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये प्रस्तावित मार्ग, संभाव्य प्रवासी संख्या, व्यवहार्यता अभ्यास, भविष्यातील विस्तार योजना, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेशी समन्वय आणि शहर विकास आराखड्याशी सुसंगतता याबाबत माहिती देण्यात आली.

RMC : पुण्यात वीकेंडला आरएमसी मिक्सर वाहनांना प्रवेश; कॅमेरा, मद्यतपासणीसह कडक सुरक्षा नियम

यावेळी लोकप्रतिनिधींनी नव्याने विकसित होणाऱ्या निवासी भाग, औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक केंद्रे आणि प्रमुख वाहतूक मार्ग यांना प्रभावीपणे जोडणारे मेट्रो नेटवर्क उभारण्याची आवश्यकता व्यक्त केली. शहराच्या भविष्यातील लोकसंख्या वाढ आणि विस्तारणाऱ्या हद्दीचा विचार करून डीपीआरमध्ये योग्य त्या सुधारणा करण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.

MS-CET : बोगस गुण, लाखांचे ‘पॅकेज’ अन्… ; शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा!

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો