મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Panvel Sex Racket : पनवेलमध्ये वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा — पाच पीडित महिलांची सुटका

Panvel Police Busted Sex Racket : प्रशांत लॉजवर छापा टाकून मॅनेजर व वेटर अटकेत; महिला पुरवणारा फरार

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Panvel Sex Racket: Police raid prostitution racket in Panvel — five victim women rescued
Panvel Sex Racket: Police raid prostitution racket in Panvel — five victim women rescued

Panvel Police Busted Sex Racket : प्रशांत लॉजवर छापा टाकून मॅनेजर व वेटर अटकेत; महिला पुरवणारा फरार

पनवेल :- पनवेलच्या हृदयस्थानी असलेल्या मुंबई-पुणे महामार्गालगतच्या प्रसिद्ध ‘प्रशांत लॉजिंग’मध्ये Panvel Prashant lodge गेल्या काही महिन्यांपासून एक अवैध वेश्याव्यवसाय चालवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Panvel Sex Racket News

30 मे च्या रात्री, एखाद्या चित्रपटाला शोभेल अशा पद्धतीने पोलीस पथकाने छापा टाकून 5 महिलांची सुटका केली, ज्यांना जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलण्यात आले होते. Panvel Latest Crime News

मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाची यशस्वी कारवाई; पोलीस आयुक्तांच्या आदेशाने विशेष मोहीम

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

ही मोहीम मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त), संजय येनपुरे (सह आयुक्त), दीपक साकोरे (अपर आयुक्त - गुन्हे), व अमित काळे (उप आयुक्त - गुन्हे शाखा, नवी मुंबई) यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली.

शुक्रवारी (30 मे) रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ बनावट ग्राहक तयार करून लॉजमध्ये पाठवले. ग्राहकाने ठरल्याप्रमाणे सिग्नल दिल्यानंतर, २२:२३ वाजता पोलिसांनी गनिमी काव्याने लॉजवर धाड टाकली.

त्या क्षणी लॉजमधील वेटर अरुणकांत चतुर्वेदी महिलांना ग्राहकांसमोर मांडत होता आणि मॅनेजर राजू दास व्यवहार ठरवत होता. हे सर्व करत असताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले.तपासात उघड झाले की, मयुर डावरे नावाचा दलाल महिला पुरवण्याचे काम करत होता, तर लॉजचा मालक अरुण शेट्टी या सर्व कारवायांना मूक संमती देत होता. हा लॉज काही काळापासून देहव्यापाराचे अड्डे म्हणून वापरला जात होता.

पनवेल शहर पोलीस ठाण्यात Panvel Police Station याप्रकरणी नोंदवण्यात आला असून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता 2023 व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अटक केलेल्या आरोपींना २ जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर मयुर डावरे आणि अरुण शेट्टी फरार आहेत.

या कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे व त्यांच्या पथकाने सहभाग घेतला असुन, पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा: अंबोलीतील ‘ड्रग्ज अड्डा’ : पोलिसांच्या साठेबाज संरक्षणाखाली नशेत बुडालेले तरुण!

શેર કરો