મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

New Delhi : दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीची महागर्जना; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 20 विरोधी पक्ष एकवटले

•ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा आणि 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेच्या निषेधार्थ दिल्लीत विराट मोर्चा; राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासह प्रमुख नेत्यांची आक्रमक भाषणे

વ
વિવેક

2 મિનિટ વાંચન

New Delhi : दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीची महागर्जना; मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 20 विरोधी पक्ष एकवटले

•ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा आणि 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेच्या निषेधार्थ दिल्लीत विराट मोर्चा; राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्यासह प्रमुख नेत्यांची आक्रमक भाषणे

नवी दिल्ली :- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आणि विविध राजकीय मुद्द्यांवर आक्रमक होत. 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या वतीने रविवारी (1 नोव्हेंबर) रोजी दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर एक भव्य महामोर्चा आणि जाहीर सभा पार पडली. या आंदोलनात देशातील तब्बल 20 प्रमुख विरोधी पक्षांचे नेते आणि हजारो कार्यकर्ते एकत्र आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्र्या ममता बॅनर्जी, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे,समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक दिग्गज नेते या मंचावर उपस्थित होते. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

તસવીરો · 1/4

Arrow Keys ⟵ ⟶

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचे केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

या सभेत बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. लोकशाहीचा गळा दाबला जात असल्याचा आरोप करत त्यांनी, "ज्ञानेश कुमार यांनी राष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असून त्यांना या कृत्याची कायदेशीर शिक्षा भोगावी लागेल," असेम्हटले. तसेच, मागील निवडणुकीतील मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा लढा देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. याशिवाय, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील सरकारविरोधी आक्रमक भूमिका मांडत विरोधी पक्ष अधिक तीव्र लढा देणार असल्याचे स्पष्ट केले.

विविधपक्षीय नेत्यांचा सहभाग आणि कडक सुरक्षा व्यवस्था

या महामोर्चादरम्यान ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांनी देखील केंद्रातील भाजप सरकारवर घणाघाती टीका केली. निवडणूक यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी एकाच सुरात हुकूमशाहीविरोधात एल्गार पुकारला. या विशाल मोर्चानिमित्त दिल्लीतील रामलीला मैदान व परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य गर्दीच्या नियंत्रणासाठी दिल्ली पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था व बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा: Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींवर गंभीर आरोप; विरोधकांच्या आंदोलनामागे चीनचे कनेक्शन असल्याचा दावा

શેર કરો