મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mumbai Rain Update: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले!

२४ तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस; लोकल, रस्ते आणि विमानसेवा विस्कळीत

મ
મુબારક

3 મિનિટ વાંચન

Mumbai Rain Update: मुसळधार पावसाने मुंबईला झोडपले!

२४ तासांत १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस; लोकल, रस्ते आणि विमानसेवा विस्कळीत

Mumbai Rain Update: महाराष्ट्र मिरर, मुंबई

मुंबई आणि परिसरात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Mumbai Rain Update) जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. बुधवार, १ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत मुंबईतील अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. या पावसामुळे सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक इतर मार्गांवर वळवावी लागली असून, रेल्वे आणि हवाई सेवेलाही याचा मोठा फटका बसला आहे.(Mumbai Rain Update heavy rainfall local trains flight services disrupted)

पूर्व उपनगरात सर्वाधिक पाऊस, मानखुर्द आघाडीवर

बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ८ ते बुधवारी सकाळी ८ या वेळेत पूर्व उपनगरात सरासरी १०९ मिमी, पश्चिम उपनगरात ८७ मिमी आणि मुख्य मुंबई शहरात ८६ मिमी पावसाची नोंद झाली. (Mumbai Rain Update) बीएमसीच्या स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रणेनुसार, मानखुर्द येथे सर्वाधिक १७०.४ मिमी पाऊस झाला. त्याखालोखाल भायखळा येथे १६२.५२ मिमी, मुंबई सेंट्रल परिसरात १४२.४३ मिमी आणि वडाळ्यात १२७ मिमी पाऊस पडला. पश्चिम उपनगराचा विचार केल्यास, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे १३२.४ मिमी आणि बोरिवलीत १२६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दिंडोशी येथेही १२३ मिमी पाऊस झाला.

अंधेरी सबवे बंद; रेल्वे आणि बस सेवेला फटका

बुधवारी सकाळी ७ ते ८ या एका तासाच्या कालावधीत अंधेरी पश्चिम येथे सर्वाधिक ३९ मिमी पाऊस झाला, तर अंधेरी पूर्व येथे ३४ मिमी आणि वांद्रे पश्चिम येथे २४ मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे(Mumbai Rain Update) अंधेरी भुयारी मार्ग (अंधेरी सबवे) आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने येथील वाहतूक इतर मार्गांवर वळवली.

हेही वाचा: Marathi News | मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री वेश्या व्यवसायात सापडली; मुंबई पोलिसांनी केली सुटका

दुसरीकडे, बेस्ट (BEST) बस वाहतूक प्रशासनाकडून सामान्यपणे सुरू असल्याचा दावा करण्यात आला असला तरी वाहतूक कोंडीमुळे बसेसचा वेग मंदावला होता. रेल्वे प्रवाशांनाही याचा मोठा फटका बसला. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा विलंबाने धावत होत्या. त्यातच पहाटे ४.५२ ते ५.४५ दरम्यान हार्बर मार्गावरील विद्युत तारा (OHE) तुटल्यामुळे नवी मुंबईला मुंबईशी जोडणारी रेल्वे सेवा काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

व्यापारी आणि वाहनचालक हवालदील; जनजीवन विस्कळीत

रस्त्यांवर आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये पाणी साचल्याने अनेक दुकानांमध्ये पावसाचे (Mumbai Rain Update) पाणी शिरले. त्यामुळे व्यापाऱ्यांना आपला माल वाचवण्यासाठी मोठी धडपड करावी लागली. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने बंद पडली, ज्यामुळे वाहनचालकांना आपली वाहने सुरक्षित स्थळी हलवावी लागली. अनेक प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुंबईकरांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले.

MUMBAI NEWS : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेचे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान: देवेंद्र फडणवीस

प्रशासनाचा नागरिकांना सल्ला
"सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे," असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच पालिका आयुक्तांनी सर्व संबंधित यंत्रणांना ड्रेनेज व्यवस्थेवर चोवीस तास लक्ष ठेवण्याचे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.

विमान सेवेलाही ब्रेक, उड्डाणे वळवली

मुसळधार पावसाचा फटका केवळ जमिनीवरील वाहतुकीलाच नाही, तर विमान सेवेलाही बसला आहे. पावसामुळे मुंबई विमानतळ परिसरातील दृश्यमानता (Visibility) कमालीची कमी झाली आहे. परिणामी, मुंबई विमानतळावर येणारी अनेक उड्डाणे इतरत्र वळवण्यात आली असून, अनेक विमानांच्या उड्डाणांना विलंब होत आहे. यामुळे विमान प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागत आहे.

PCMC News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या

एककीडे मुंबई पावसाने ठप्प झाली असताना, दुसरीकडे राजकीय वातावरणही तापलेले पाहायला मिळाले. मुंबईत परवानगीशिवाय 'आरक्षण विरोधी आंदोलन' आणि मोर्चा काढल्याप्रकरणी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांवर मुंबई पोलिसांनी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. या आंदोलनामुळे मुंबईतील काही भागांत तणाव आणि वाहतूक कोंडीत आणखी भर पडली.

શેર કરો