મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

अखेर Mukunddas Lohiya College वर AICTE ची कारवाई

पुणे, महाराष्ट्र मिरर

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

3 મિનિટ વાંચન

Mukunddas Lohiya College

Mukunddas Lohiya College : मुकुंददास लोहिया इंजिनिअरिंग कॉलेजवर AICTE ची कारवाई; पायाभूत सुविधांच्या अभावावरून संस्थेला नोटीस जारी

पुणे, महाराष्ट्र मिरर

धनश्री ओतारी

Mukunddas Lohiya College : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचालित मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या कारभाराविरोधात आणि नियमावलीच्या उल्लंघनावरून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयात आवश्यक इमारत व पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध नसतानाही देण्यात आलेली मान्यता रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी युवा शिवसेना नेते कल्पेश यादव यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कार्यालयाकडे सबळ पुरावे व प्रतिज्ञापत्रासह तक्रार दाखल आली होती. दरम्यान, या तक्रारीची गंभीर दखल घेत अखेर कॉलेजवर कारवाई करण्यात आली आहे. Mukunddas Lohiya College building controversy

तक्रारीची गंभीर दखल घेत अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद कार्यालयाने महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीला आपले म्हणणे मांडण्यासाठी २२ मे २०२६ रोजी पहिले पत्र पाठवले होते. त्यानंतर ११ व १२ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संस्थेकडून कोणताही खुलासा प्राप्त न झाल्याने, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ने ७ जुलै २०२६ रोजी पुन्हा एकदा संस्थेला पत्र पाठवून विचारणा केली आहे. दिलेल्या मुदतीत उत्तर सादर न केल्यामुळे संस्थेची भूमिका अत्यंत संशयास्पद असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. Mukunddas Lohiya College

CJP Delhi Protest : ‘दगडावरील ठसे’ आधारशी जोडणार? चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर विरोधकांचा उपरोधिक हल्लाबोल

संस्थेकडून समाधानकारक खुलासा न आल्याने तक्रारदारांनी अतिरिक्त पुरावे सादर करत कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने संस्थेला चार आठवड्यांच्या आत आपले स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देणारी नोटीस बजावली आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार संस्थेने अद्याप या नोटीसबाबत कोणतेही अधिकृत उत्तर किंवा म्हणणे मांडलेले नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदच्या बैठकांना गैरहजर राहणे अथवा उत्तरे टाळणे यावरून संस्थेकडे आपली बाजू मांडण्यासाठी पुरेसे समर्थन नाही, अथवा केंद्रीय प्राधिकरणाच्या नोटिसांकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. Mukunddas Lohiya College

शुल्क नियामक प्राधिकरणावरील सदस्याच्या नियुक्तीवरून वाद

इमारत व पायाभूत सुविधा नसतानाही मुकुंददास लोहिया इंजिनिअरिंग कॉलेजचे वर्ग सुरू करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) आणि संस्थेच्या हितार्थ अहवाल दिल्याचा ठपका असलेले दत्तात्रय व्यंकटराव जाधव यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) समितीवर 'व्यावसायिक शिक्षण तज्ज्ञ' म्हणून निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला असून, भ्रष्ट कारभाराचा ठपका असलेल्या अधिकाऱ्याला समितीवर सदस्य पद देऊन एकप्रकारे 'बक्षीस' देण्यात आले आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित अधिकाऱ्याचा या क्षेत्रातील सामाजिक अनुभव आणि पार्श्वभूमी तपासून या नियुक्तीबाबत फेरविचार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. Mukunddas Lohiya College

PMC : ‘पुष्पा’ फेम वृक्ष अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; ५ लाखांची लाचखोरी अन्

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (एमईएस) मुकुंददास लोहिया कॉलेज हाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाला नियम धाब्यावर बसवून मान्यता दिल्याचा आरोप करण्यात आला होता, सा कॉलेजची इमारत तयार नसतानाही मान्यता देण्यात आल्याचा दावा करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेने केली होती

मार्चमध्ये युवासेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी पत्रकार परिषदेत यांनी मोठा खुलासा केला होता की, व्यावसायिक शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (AICTE) कठोर नियम पाळणे अनिवार्य असते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (DBATU), लोणेरे यांची संलग्नता आणि राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाची (DTE) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सीईटीमार्फत (CET) प्रवेश दिले जातात. मात्र, महाविद्यालयाची इमारत पूर्ण झालेली नसताना आणि आवश्यक सुविधा कागदोपत्रीच दाखवून डीटीई (DTE) व शुल्क नियामक प्राधिकरणाने (FRA) प्रवेश आणि शुल्क आकारणीला मंजुरी देण्यात आली होती. Mukunddas Lohiya College

इमारत नसताना २४० जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात शिकवले जात असल्याचा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा दावा युवासेनेने केला होता. युवासेनेने या प्रकरणातील कागदपत्रे आणि पुरावे AICTE च्या दिल्ली मुख्यालयात सादर करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती.

Kodre Farms : कृषी जमिनीवरील बेकायदा व्यावसायिक वापर महागात; कोद्रे फार्म्सवर एनजीटीचा १.३४ कोटींचा पर्यावरण दंड

महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असूनही शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी २४० विद्यार्थ्यांच्या प्रवेशक्षमतेची प्रक्रिया राबवण्यात आली होती. अपूर्ण इमारतीच्या पार्श्वभूमीवर २३ जून २०२५ रोजी सुरू असलेली ही प्रवेश प्रक्रिया नेमक्या कोणत्या निकषांवर राबवण्यात आली, याबाबत आता अधिकृत खुलासा होणे गरजेचे असल्याचे मत विद्यार्थी पालकांमधून व्यक्त होत होते. या कॉलेजच्या नावाखाली हे विद्यार्थी दुसर्या कॉलेजमध्ये शिकत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (डीबीएटीयू) यांनी जून २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी संचलित मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांना जुलै २०२५ पासून एक वर्षापुरती संलग्नता मंजूर करण्यात आली होती. स्थानिक तपासणी समितीच्या अहवालाच्या आधारे पुढील अभ्यासक्रमांना प्रत्येकी ६० अशी प्रवेशक्षमता देण्यात आली होती.

https://www.instagram.com/reel/DbdgkkRIBtz/?igsh=a243cHY2ZDdyZGRr

શેર કરો