Khadakwasla : खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 મિનિટ વાંચન

Khadakwasla : पुण्यातील खडकवासला धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
पुणे, महाराष्ट्र मिरर
Khadakwasla : पुण्यातील घाटमाथ्यावर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसगात मोठी वाढ केली आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' (Red Alert)जा री केला असून, पुढील काही दिवस शहर व परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Khadakwasla dam Red Alert pune rain

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आहे. पाण्याच्या पातळीवरील नियंत्रण राखण्यासाठी आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात दुपारी ३:०० वाजता विसर्ग वाढवून 27,203 क्युसेक्स करण्यात आला आहे. पाण्याची आवक आणि पावसाचा जोर पाहून हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून ४५,००० क्युसेक्स पर्यंत नेण्यात येण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे. Khadakwasla
Amit Shah : तुमचं ते लेकरू आमचं ते कार्ट.. शहांच्या दौऱ्यावरुन रणकंदन
खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्यामुळे मुठा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे नदीपात्रातील रस्ते, पूल आणि काही सखल भागातील बांधकामे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या सर्व नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी हालचाली करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे आवाहन
नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने काही कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत:
नागरिकांनी किंवा पर्यटकांनी कोणत्याही परिस्थितीत मुठा नदीपात्रात किंवा नदीकाठी जाणे टाळावे.
नदीकाठच्या परिसरातील शेतीचे पाण्याचे पंप, अवजारे, वाहने, जनावरे आणि इतर महत्त्वाचे साहित्य तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे.
सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. तसेच, सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, केवळ जिल्हा प्रशासन, महानगरपालिका किंवा हवामान खात्याच्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावे.
PMC : ‘पुष्पा’ फेम वृक्ष अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; ५ लाखांची लाचखोरी अन्

परिस्थितੀचे गांभीर्य लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासन, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत, पोलीस यंत्रणा तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागांना आपापल्या क्षेत्रात पूर्णपणे सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांना वेळोवेळी धोक्याची पूर्वसूचना देऊन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/DbafYwAtCkD/?igsh=MTF0dzJsOGt5M3ZxYQ%3D%3D
