મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Ind vs Pak : भारत-पाक तणाव कमी करण्यासाठी ११७ दिग्गजांचे संयुक्त आवाहन

भारत-पाक तणाव कमी करण्यासाठी 117 दिग्गजांचे मोदी-शाहबाज यांना पत्र

મ
મુબારક

2 મિનિટ વાંચન

Ind vs Pak : भारत-पाक तणाव कमी करण्यासाठी ११७ दिग्गजांचे संयुक्त आवाहन
Ind vs Pak peace appeal 117 prominent citizens letter modi Shahbaz sharif

भारत-पाक तणाव कमी करण्यासाठी 117 दिग्गजांचे मोदी-शाहबाज यांना पत्र

नवी दिल्ली, महाराष्ट्र मिरर : भारत आणि पाकिस्तान ((Ind vs Pak )) यांच्यातील दीर्घकालीन तणाव कमी करून दोन्ही देशांमध्ये पुन्हा संवाद सुरू करण्याच्या उद्देशाने भारत व पाकिस्तानातील ११७ प्रमुख व्यक्तींनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना संयुक्त खुले पत्र पाठविले आहे.(Ind vs Pak peace appeal 117 prominent citizens letter modi Shahbaz sharif) या पत्रामध्ये दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध पूर्ववत करणे, व्हिसा सेवा आणि हवाई क्षेत्र पुन्हा खुले करणे, तसेच लोकांमधील संपर्क वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Shoeb Akhtar Brother Dead : पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्ययात्रेला पोहोचला लष्करचा उपप्रमुख सैफुल्ला? व्हिडिओ व्हायरल होत आहे

'सेंटर फॉर पीस अँड प्रोग्रेस' या संस्थेच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या या पत्रावर भारतातील ६१ आणि पाकिस्तानातील ५६ अशा एकूण ११७ मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak ) मिळून जगातील जवळपास पाचव्या भागाच्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे दोन्ही देशांतील नागरिकांना शांतता, विकास आणि सहकार्यावर आधारित भविष्य मिळणे आवश्यक असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

भारतीय स्वाक्षरीदारांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, मीरवाइज उमर फारूक, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती, राज्यसभा सदस्य मनोज झा तसेच माजी मंत्री हुमायून कबीर यांचा समावेश आहे. पाकिस्तानच्या बाजूने माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी, माजी मुत्सद्दी अशरफ जहांगीर काझी, नॅशनल असेंब्ली सदस्य इस्फन्यार भंडारा आणि अणुशास्त्रज्ञ परवेझ हुदभॉय यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

पत्रामध्ये दोन्ही सरकारांनी तातडीने विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार नवी दिल्ली आणि इस्लामाबाद येथे पुन्हा उच्चायुक्तांची नियुक्ती करणे, नियमित व्हिसा सेवा सुरू करणे, व्यावसायिक विमान वाहतुकीसाठी हवाई क्षेत्र खुले करणे, अटारी-वाघा सीमारेषा व्यापार व प्रवासासाठी पुन्हा सुरू करणे, तसेच श्रीनगर-मुझफ्फराबाद बस सेवेसह सीमापार संपर्काच्या इतर उपक्रमांना पुनर्जीवित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संवादालाही चालना देण्याची आवश्यकता पत्रात अधोरेखित करण्यात आली आहे.

दरम्यान, या उपक्रमाचे स्वागत करताना मेहबूबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीर प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडविण्याची संधी केंद्र सरकारने साधावी, असे मत व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही वरिष्ठ पदाधिकारीही पाकिस्तानशी संवादाची भूमिका मांडत असल्याचा उल्लेख करून त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या "मित्र बदलता येतात, पण शेजारी बदलता येत नाहीत" या विचाराची आठवण करून दिली. संवादातून जम्मू-काश्मीरसह संपूर्ण दक्षिण आशियामध्ये दीर्घकालीन शांतता आणि आर्थिक सहकार्याला चालना मिळू शकते, असे त्यांनी म्हटले.

Eknath Shinde : “गॅस टंचाईची भीती पसरवून साठेबाजांचे फाते करू नका”; पंतप्रधान भेटीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार

मात्र, या आवाहनावर विरोधी मतही समोर आले आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी या पत्रावर टीका करत सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानशी संवाद सुरू करण्याची वेळ योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. पाकिस्तानशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार केवळ भारत सरकारलाच असून, अशा प्रकारच्या सार्वजनिक आवाहनांशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

શેર કરો