राज्यात अतिवृष्टीचा कहर – मुख्यमंत्री सतत संपर्कात, प्रशासन अलर्ट मोडवर
पुणे, सातारा, मुंबईसह अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार बचावकार्य वेगात; एनडीआरएफ, पोलिस, महापालिका सज्ज – मुख्यमंत्री फडणवीस यांचा आढावा
1 મિનિટ વાંચન
पुणे, सातारा, मुंबईसह अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार बचावकार्य वेगात; एनडीआरएफ, पोलिस, महापालिका सज्ज – मुख्यमंत्री फडणवीस यांचा आढावा
मुंबई :- राज्यात गेल्या 24 तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई व एमएमआर परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परिस्थितीवर सतत नजर ठेवून असून, त्यांनी संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून मदतकार्य हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ते मुख्य सचिव आणि आपत्ती निवारण कक्षाशी सातत्याने संपर्कात आहेत.
प्रमुख घटक:
सर्व यंत्रणा पूर्ण सज्ज असून, आपत्कालीन मदतीसाठी एनडीआरएफच्या टीम्स विविध ठिकाणी तैनात आहेत.
हेही वाचा: Maharashtra Rain Update : मुसळधार पावसाची महाराष्ट्रात एंट्री, मुंबईसह 11 जिल्ह्यांवर संकटाची छाया!
