મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Fake Medicine Pune | वानवडी येथील हॉस्पिटलमध्ये बनावट औषधे पुरविणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल

Fake Medicine Pune | एफडीएकडून तक्रार : शिक्रापूर येथे गुन्हा दाखल

મ
મુબારક

1 મિનિટ વાંચન

fake medicine pune

  • Fake Medicine Pune | एफडीएकडून तक्रार : शिक्रापूर येथे गुन्हा दाखल
  • पुणे, १४, महाराष्ट्र मिरर : Fake Medicine Pune

    बनावट औषधांचा खुलेआम चालणारा काळाबाजार आता एफडीएच्या रडारवर आला आहे. पुण्यातील वानवडी येथील एका हॉस्पिटलमधून बनावट औषधे पकडल्यानंतर शिक्रापूर येथील फार्मास्युटिकल्स औषध निर्मिती कंपनीच्या मालकासह तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. Fake Medicine Pune, Crime News Pune

    याबाबत अधिक माहिती अशी कि, अन्न-औषध प्रशासनाने मार्च २०२५ मध्ये वानवडी येथील हॉस्पिटलमधून बनावट औषधे पकडली होती. औषधे प्रतिमा फार्मास्युटिकल्समध्ये बनविली गेल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांची चौकशी केली असता, कुठल्याच औषधे निर्मितीची परवानगी नसताना औषधे बविल्याचे उघडकीस आले. Fake Medicine Pune, pune news, pune crime news, pune police news

    अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक मनोज अय्या (वय ४५, रा. स्पाईन रोड, मोशी, पुणे) यांनी शिक्रापूर पोलिसांकडे फिर्याद दिल्यावरून डॉ. प्रतीक पलांडे, गुणवत्ता नियंत्रक संदीप क्षीरसागर, उत्पादन अधिकारी अंजन शेळके व रमेश डोमले (चौघेही रा. शिक्रापूर, ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    प्रतिमा फार्मास्युटिकल्स Pratima Pharmacitucals Shikrapur या औषध निर्मिती कंपनीने मानवी आरोग्यास घातक असलेल्या २१ बनावट औषधे उप्तादित केली व पुण्यासह मुंबईत वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे कंपनी मालक डॉ. प्रतीक पंडित पलांडे यांच्यासह त्यांना मदत करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केले. याबाबत शिक्रापूर पोलिसांकडे अन्न आणि औषध प्रशासनाने रविवारी (ता.१३) फिर्याद दाखल केली आहे. सर्व आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
    शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की,

    प्रतिमा फार्मास्युटिकल्स कंपनीने पुणे व मुंबईत २१ प्रकारची औषधे वितरित झाल्याची सखोल माहिती घेतली. पोलिसांनी त्यांच्याकडून ५५ लाख ६२ हजार ९३ रुपये आणि त्यासोबत काही कागदपत्रे जप्त केली. याप्रकरणी प्रशासनाकडून फार्मास्युटिकल्सला नोटीस बजावून त्यांची सुनावणी घेतली.

    हेही वाचा: Naigaon News : अडकलेल्या शटल कॉकचा जीवावर बेतला खेळ! नायगावमध्ये विजेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

    શેર કરો