Pune Crime News : जमीन हडपण्यासाठी तयार केली बनावट कागदपत्रे
देहूरोड येथे दोघांवर गुन्हा दाखल
1 મિનિટ વાંચન

देहूरोड येथे दोघांवर गुन्हा दाखलhttps://maharashtramirror.com/

पिंपरी, महाराष्ट्र मिरर : देहूरोड परिसरात जमीन हडपण्याच्या उद्देशाने मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून मालमत्तेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिंकू संतोष म्हालोत्रा (वय ३४) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश पुरणलाल अग्रवाल (६८) आणि विशाल सतीश अग्रवाल (४२, दोघे रा. देहूरोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (maharashtra mirror)
पोलीस दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील सर्व्हे नं. २८/१/१/१५ मधील ४.५ गुंठे जमिनीपैकी २.२५ गुंठे जमिनीवर हक्क दाखवण्यासाठी संशयितांनी आपापसात संगनमत केले. २० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर नोटरीची बनावट पावती आणि फिर्यादीच्या मृत नातेवाइकांच्या नावाने खोट्या स्वाक्षऱ्या करून बनावट दस्तऐवज तयार केले. या आधारे जमीन हस्तांतरणाचा हक्क असल्याचा दावा करत ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. देहूरोड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. (maharashtra mirror)
