મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Crime News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ५ लाखांच्या खंडणीचा प्रयत्न; महामार्ग वाहतूक पोलिसांच्या ५ कर्मचाऱ्यांना अटक

पुणे : Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधील प्रवाशांकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महामार्ग वाहतूक पोलिसांच्या ६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

1 મિનિટ વાંચન

Crime News

Crime News : सहा आरोपींवर शिस्तभंगाची कारवाईही सुरू

पुणे : Crime News : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधील प्रवाशांकडून ५ लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महामार्ग वाहतूक पोलिसांच्या ६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. ( Crime News Pune Mumbai Expressway 5 lakh extortion)

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाईदेखील सुरू करण्यात आली आहे. खंडाळा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले ६ आरोपी पुढीलप्रमाणे आहेत: पोलीस नाईक (चालक) अमोल वायकर, पोलीस अंमलदार अमोल नन्नावरे, पोलीस अंमलदार तुषार ढवळे आणि वार्डन किसान बोंबले, नितेश चव्हाण व तुषार घाडगे.

Pune Flood : खडकवासलातून २७ हजार क्युसेक विसर्ग; महापौर मंजुषा नागपुरे पहाटेच ‘अ‍ॅक्शन मोड’वर

द्रुतगती मार्गावर कार अडवली
याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भूषित उमेश शर्मा हे त्यांच्या तीन मित्रांसह रविवारी (५ जुलै) टाटा पंच कारने पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरून पुण्याकडून लोणावळ्याच्या दिशेने जात होते.

कारवाई टाळण्यासाठी ५ लाखांची मागणी
मावळ तालुक्यातील ताजे गावाजवळ अंबर दिवा लावलेल्या एका झायलो कारने त्यांची गाडी अडवली. महामार्ग वाहतूक पोलिसांचा गणवेश घातलेल्या सहा जणांनी तक्रारदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थांबवले. कारमधील प्रवाशांकडे अमली पदार्थ (ड्रग्स) असल्याचा आरोप करत त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. तसेच ही कारवाई टाळण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली.

Pune Rain : कामं केलेल्या ८५ ठिकाणांचे थेट पावसातील फोटो दाखवा मंत्री मोहोळांकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती!

त्यानंतर आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी तळेगावच्या दिशेने जाण्यास भाग पाडले. तळेगाव येथे तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तेथून पळ काढला.

भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १२७(२), ३०८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

https://english.maharashtramirror.com/pune-rain-mohol-pmc-waterlogging-review/

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

શેર કરો