મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Amit Shah : तुमचं ते लेकरू आमचं ते कार्ट.. शहांच्या दौऱ्यावरुन रणकंदन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियोजित पुणे दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू आहे.

ધઓ
ધનશ્રી ઓતારી

2 મિનિટ વાંચન

Amit Shah

Amit Shah : पुण्यात सरकारला पुणेरी टोमणे मारणारे बॅनर्स झळकले

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या एक ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियोजित पुणे दौऱ्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये रणकंदन सुरू आहे. अशातच, पुण्यात सरकारला पुणेरी टोमणे मारणारे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे शहांच्या दौऱ्यादिवशी नेमकं शहरात काय घडणार? याची चर्चा शहरवासीयांमध्ये जोरदार सुरु आहे. amit shah pune visit banners controversy

तुमचं ते लेकरू आमचं ते कार्ट..
अशा आशयाचे पुणेरी टोमणे मारणारे बॅनर पुण्याच्या पाषाण रोड परिसरात लावण्यात आले आहेत. या बॅनर मध्ये एकीकडे मंत्र्यांची मुले आपल्या सुखी आयुष्याची चर्चा करताना दाखवण्यात आलेत तर दुसरीकडे जंतर मंतर वर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जेचा फोटो लावण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौरा दरम्यान हे बॅनर लावण्यात आल्याने ह्या बॅनर ची चर्चा संपूर्ण पुण्यात होत आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्यावतीने हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Kodre Farms : कृषी जमिनीवरील बेकायदा व्यावसायिक वापर महागात; कोद्रे फार्म्सवर एनजीटीचा १.३४ कोटींचा पर्यावरण दंड

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या १ ऑगस्ट रोजी नियोजित पुणे शहर दौऱ्यावर आहेत. शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या प्रशासनाच्या या भुमिकेवर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Amit Shah

दिल्लीत विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या मारहाणीच्या निषेधार्ह पुण्यात शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज् चौकात आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. काँग्रेसच्या या आंदोलनाला विरोध म्हणून याच चौकात भाजपकडून आंदोलन करण्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी जाहीर केले आहे. जगताप आणि घाटे या दोघांनीही पोलिसांनी याबाबत निवेदन दिले आहे. Amit Shah

PMC : ‘पुष्पा’ फेम वृक्ष अधिकाऱ्याचा आणखी एक प्रताप उघड; ५ लाखांची लाचखोरी अन्

तर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी काँग्रेसला प्रतिआव्हान दिले आहे. काँग्रेसला आंदोलनाची परवानगी दिली गेल्यास भाजपलाही प्रतिआंदोलनाची परवानगी द्यावी, अशी मागणी घाटे यांनी केली आहे. शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास भाजप जशास तसे उत्तर देईल, अशी भूमिका घाटे यांनी स्पष्ट केली आहे.

FacebookTwitterEmailWhatsAppShare

શેર કરો