મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती मिळणार; चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सकारात्मक बैठक

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

વિક્રાંત કુલકર્ણી
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती मिळणार
चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात सकारात्मक बैठक

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. NET-SET आणि पीएच.डी.धारक संघर्ष समितीच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्राध्यापक भरती प्रक्रियेतील अडचणी आणि उमेदवारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

राज्यातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची अनेक पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत आहे. पात्रता पूर्ण करूनही अनेक NET-SET आणि पीएच.डी.धारक उमेदवारांना नोकरीच्या संधींसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याची मागणी उमेदवारांकडून सातत्याने केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी प्राध्यापक भरती प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने विद्यापीठांच्या कुलसचिवांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीत भरती प्रक्रियेतील अडथळे, रिक्त पदांचा आढावा आणि आवश्यक प्रशासकीय बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मंत्रालयातील या सकारात्मक चर्चेमुळे प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता शासनाकडून पुढील कार्यवाही कधी केली जाते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

શેર કરો
વિક્રાંત કુલકર્ણી

News and Vedio editor

i am vikrant kulkarni. i am news and vedio editor of maharashtra mirror news paper