Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 : गेली ती शिवशाही, आली गुंडाशाही; विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी
•उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे
मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन चालू आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प सादर करणारा आहे. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे सर्व आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. हातात प्रतीकात्मक बंदुकी घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते विधानपरिषद अंबादास दानवे यांनी “गेली ती शिवशाही, आली गुंडाशाही” सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहे. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024
मागील काही महिन्यात राजकीय गोळीबाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून विरोधकांना आणि अधिवेशनात आयते कोलीत भेटल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावर सरकारला कोंडीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024
गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र मध्ये झालेले गोळीबार
शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली. पुण्यात पत्रकार निखील वागळे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये दोन लोकांवर गोळीबार केला. 22 जानेवारी रोजी मीरा रोड येथे धार्मिक तणाव, सरकारने बुलडोझर चालवून गरिबांची घरे तोडली. जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. यवतमाळ शहरात भर दिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आली. Maharashtra Assembly Interim Budget Session 2024