ठाणेक्राईम न्यूज

आर्थिक फसवणूक ; ज्येष्ठ नागरिकाची तीन लाखांहून अधिक आर्थिक फसवणूक

Dombivli Financial Fraud News : एन ई एफ टी च्या नावाने ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक फसवणूक, डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

डोंबिवली :- ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन आर्थिक Online Fraud News फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक तीन लाखाहून अधिक किमतीची असल्याने डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. एन ई एफ टी व्यवहारा बाबत माहिती घेऊन आर्थिक फसवणूक Financial Fraud झाल्याचे घटना समजली आहे. यामध्ये फिर्यादी महिला (74 वर्ष) यांना अनोळखी मोबाईल नंबर वरून कॉल येऊन एनईएफटी व्यवहाराबाबत संपूर्ण माहिती घेऊन महिलेच्या बँक खात्यातील तीन लाखाहुन अधिक किमतीची आर्थिक फसवणूक झाल्याचे घटना समोर आली आहे. Thane Crime News

फिर्यादी महिला, (74 वर्षे), (व्यवसाय-सेवानिवृत्त, रा.डोंबिवली पूर्व) यांना अनोळखी मोबाईलधारक इसमाने काॅल करून एनईएफटी FNIT मार्फत केलेली रक्कम तुम्हीच केली आहे काय याची खात्री करण्यासाठी त्यांचे बॅंक खातेची माहिती विचारली. त्यानंतर आरोपीत याने फिर्यादी यांचे पंजाब नॅशनल बॅंक खातेतुन एकुण 3 लाख 32 हजार 010‌ रूपये रक्कम परस्पंर ऑनलाईन पध्दतीने काढुन घेवून त्यांची आर्थिक फसवणुक केली आहे. प्रकाराबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक आरोपींविरुध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत. Thane Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0