Bhiwandi Crime News : भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त, हजारो रुपयाचे विमल पान मसाला जप्त

•87 हजार 120 रुपये किमतीचे विमल पान मसाला गुटखा जप्त केल्याची घटना भिवंडी समोर आली आहे
भिवंडी :- राज्यात लोकसभा निवडणुका चालू आहे. राजकीय मंडळी प्रचारात व्यस्त असून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या दारू पैसे अमली पदार्थ गुटखाजन्य पदार्थ यांचे तस्करी खरेदी विक्री करणाऱ्या विरोधात पोलिसांनी कारवाई जा बडगा उभारला आहे. नारपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत विमल हा गुटखाजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केला राज्यात गुटखा प्रतिबंध असतानाही बेकायदेशीर आहे त्या गुटखा बाळगण्याविरुद्ध पोलीस कारवाई करत आहे.
नारपोली पोलीस ठाणे – अन्न सुरक्षा आणि मानके पथकाने काल (03 मे 2024) रोजी मध्यरात्री 01.00 वा. चे सुमारास, नारपोली पोलीस ठाणे चे पथकास मिळालेल्या माहितीवरून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोळी, पोलीस हवालदार पवार व त्यांचे पथकाने, प्रेरणा काॅम्प्लेक्स, डी-3 बिल्डींग, दुसरा मजला, दापोडा, भिवंडी येथे छापा टाकला असता, आरोपी अजय अयोध्याप्रसाद गुप्ता,( 24 वर्षे) (रा.धामणकर नाका, भिवंडी) याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखुजन्य पदार्थएकुण 87 हजार 120 रूपये किमंतीचा विमल पानमसाला बेकायदेशीररित्या विक्री करत असताना मिळुन आला.प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून आरोपींविरूध्द भा.द.वि.कलम 328,273,188,34 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2)(आय), 3(1)(झेड)(आय), 26(2)(आयव्ही), 30(2)(आय) सह शिक्षा कलम 59(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळी हे करीत आहे.