Thane Crime News : मुंब्रा पोलिसांच्या एन.डी.पी.एस. पथकाची धडक कारवाई; 18 वर्षांच्या तरुणाकडून 1 किलोहून अधिक गांजा जप्त
•"झंडुबाला बाबा, हराणी वस्ती परिसरात संशयास्पद हालचालींवरून कारवाई; 18 वर्षीय तरुण पोलिसांच्या जाळ्यात
1 min read

•"झंडुबाला बाबा, हराणी वस्ती परिसरात संशयास्पद हालचालींवरून कारवाई; 18 वर्षीय तरुण पोलिसांच्या जाळ्यात
ठाणे :- मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाऱ्यांविरोधात ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कठोर मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान मुंब्रा पोलिसांच्या एन.डी.पी.एस. पथकाचे अधिकारी व अंमलदार गस्त घालत असताना, त्यांना झंडुबाला बाबा, हराणी वस्ती येथे एक इसम संशयास्पदरित्या फिरताना आणि हालचाली करताना दिसून आला.
एन.डी.पी.एस. पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी 18 वर्षीय साहिल सिरज शेख (रा. मुंब्रा) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 28,229 रुपये किमतीचा 01 किलो 384 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.
गुन्हा दाखल करून आरोपीला अटक
या प्रकरणी आरोपी साहिल सिरज शेख याच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), 20(ब), 29 नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.


