Pune Police : ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत धडक कारवाई; मटका अड्डे उद्ध्वस्त, १५.८० ग्रॅम ‘एमडी’ अमली पदार्थ जप्त
पुणे, महाराष्ट्र मिरर
2 min read

Pune Police : चंदननगर, वाघोली व विमानतळ पोलिसांची संयुक्त कामगिरी; ९ मटका जुगारी व २ ड्रग पेडलर अटकेत
पुणे, महाराष्ट्र मिरर
Pune Police : शहर पोलिसांनी परिमंडळ-७ च्या हद्दीत राबवलेल्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी धडक कारवाई करत अवैध धंद्यांवर व अमली पदार्थ तस्करांवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंदननगर, वाघोली व विमानतळ परिसरांत पोलिसांनी टाकलेल्या धाडींमध्ये कल्याण मटका चालवणाऱ्या ९ आरोपींसह १५.८० ग्रॅम ‘एमडी’ अमली पदार्थासह दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या संयुक्त कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. pune police mission crackdown gambling drugs
Viman Nagar : विमान नगरमधील महापालिकेच्या ‘स्मार्ट’ कारभाराचे धिंडवडे
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ( Pune Police ) आणि पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून मटका जुगार अड्डे उद्ध्वस्त केले असून, वाघोली येथून अमली पदार्थ (एमडी) जप्त करण्यात यश मिळवले आहे.

साईनाथ नगरमधील कल्याण मटका अड्ड्यावर धाड
चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईनाथ नगर, गल्ली क्र. १ (वडगाव शेरी) येथे ‘कल्याण मटका’ व ‘मिलन राजधानी पूना बाजार’ नावाचा जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती विशेष पथकाला मिळाली होती. दि. २० जुलै रोजी टाकलेल्या धाडीत पोलिसांनी ९ आरोपींना रंगेहाथ ताब्यात घेतले. भीम रमेश तेलंगी (वय ३१, रा. खराडी), अर्जुन भीमराव शिंदे (वय ५०, रा. वडगाव शेरी) , नवनाथ गोरख म्हस्के (वय ५५, रा. मुंढवा), लक्ष्मण एकनाथ आढागळे (वय ४७, रा. वडगाव शेरी), निलेश राजेश गुंजाळ (वय ३६, रा. येरवडा) राजेंद्र संभाजी मोरे (वय ५४, रा. खराडी), अतिश सतीश सोनवणे (वय २९, रा. लोहगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. pune police

तर याप्रकरणी नवनाथ सुभाष गायकवाड (वय ३१, रा. खराडी), विठ्ठल छबुराव दुवे (वय ५०, रा. खराडी) यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत पोलिसांनी २,३१,५८५/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोख रक्कम, ३ दुचाकी वाहने, ६ मोबाईल हँडसेट आणि मटका जुगाराचे साहित्य समाविष्ट आहे. Pune Police
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विशाल जगदीश तिवारी (रा. खराडी) आणि जागा मालक सोनू पिल्ले (रा. वडगाव शेरी) यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

स्पोर्ट्स बाईकवरून अमली पदार्थांची विक्री; दोघे गजाआड
वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी एका स्पोर्ट्स बाईकवरून अमली पदार्थांची तस्करी होणार असल्याची खबरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून तुषार बाबासाहेब मस्के (२६) व राजाभाऊ ज्ञानदेव यादव (२७) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून १५.८० ग्रॅम ‘एमडी’ (Mephedrone) हा घातक अमली पदार्थ जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून NDPS कायद्यांतर्गत (कलम ८ (क), २१ (ब)) अटक करण्यात आली आहे. pune police
VTP Beaumonde : बिल्डर भूषण पालरेषांच्या अडचणीत वाढ; महारेराकडून …
विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगारावर विशेष पथकाने धाड टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा १२ (अ) अन्वये कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य असा ₹ १,७७०/- किमतीचा माल जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
https://www.instagram.com/reel/DbDI3jJIO7x/?igsh=MW5zN2ZhbjZyNTNoaQ%3D%3D


