Skip to content

Pune Crime : महिलेने मागितली पीएमपीएमएल कर्मचाऱ्याकडे ५० हजारांची खंडणी

Pune Crime : 'क्राईम रिपोर्टर' असल्याची बतावणी करत घातला धुडगुस

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

Pune Crime : महिलेने मागितली पीएमपीएमएल कर्मचाऱ्याकडे ५० हजारांची खंडणी
Pune Crime : 'क्राईम रिपोर्टर' असल्याची बतावणी करत घातला धुडगुस

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : आपण 'क्राईम रिपोर्टर' असल्याची बतावणी करत एका महिलेने पीएमपीएमएल कर्मचाऱ्याला मारहाण करून ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही घटना नेहरुनगर येथील संत तुकारामनगर पीएमपीएमएल डेपोमध्ये घडली.

या प्रकरणी सोनाली विनोद वाघमारे (वय ३८, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय अनिल देशपांडे (वय ३९, रा. नारायण हट सोसायटी, भोसरी) यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला दुचाकीवरून पीएमपीएमएल डेपोच्या गेटमधून आत आली. ती थेट सिक्युरिटी कॅबिनमध्ये शिरली. त्या वेळी फिर्यादी देशपांडे हे वाहनांच्या आवक-जावक रजिस्टरवर नोंदी करत होते. आरोपीने त्यांच्या हातातील रजिस्टर ओढून घेतले आणि त्यांना व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केली. देशपांडे पत्नीला फोन लावत असताना आरोपीने त्यांचा मोबाईल हिसकावून खाली आपटून फोडला. "मी क्राईम रिपोर्टर आहे, मला आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये दे,' अशी खंडणी तिने मागितली. तसेच, "तू येथे कशी ड्युटी करतो तेच बघते'' अशी धमकी देत गालात मारहाण करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Share
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper