Skip to content

Pune Crime : केशवनगरमध्ये पाच जणांकडून हत्यारे हवेत फिरवून दहशत

Pune Crime :पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

Vikrant Kulkarni
Vikrant Kulkarni

1 min read

केशवनगरमध्ये पाच जणांकडून हत्यारे हवेत फिरवून दहशत
पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर : मांजरीतील केशवनगर परिसरात दोन दुचाकींवरून आलेल्या पाच अनोळखी व्यक्तींनी हातातील हत्यारे हवेत फिरवून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. कुमार बायोप्लांट, झेड कॉर्नर, केशवनगर-मांजरी रोड येथे २३ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या दरम्यान हा प्रकार घडला.

या प्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश बेरड यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पाच जण दोन दुचाकींवरून घटनास्थळी आले. त्यांनी तेथे बेकायदेशीर जमाव जमवून हातातील हत्यारे हवेत फिरवली. तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करून पोलीस उपआयुक्त (विशेष शाखा), पुणे शहर यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला.

या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९१(२), १९१(३), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ आणि आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपी अनोळखी असून अद्याप त्यांना अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

https://epaper.maharashtramirror.com/

Share
Vikrant Kulkarni

News and Video editor

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper