PMC : पुणेकरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद; जाणून घ्या कोणत्या भागात येणार नाही पाणी
पुणे, महाराष्ट्र मिरर
3 min read

PMC : हडपसर, वानवडी, कोंढवा, येरवडा आणि खराडीसह विविध भागांत ३० जुलैला पाणीकपात
पुणे, महाराष्ट्र मिरर
खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला असून सोमवारी सकाळी धरण शंभर टक्के भरल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी पुण्यातील काही भागात सुरळीत असणारा पाणीपुरवठा खंडित करणार असल्याचे पाणि पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. PMC pune water supply cut 30 july

लष्कर जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपिंग स्टेशन अंतर्गत तातडीची विद्युत आणि यांत्रिकी (इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल) विषय देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या अत्यावश्यक कामांमुळे लष्कर पंपिंग स्टेशनच्या अखत्यारीतील संपूर्ण परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी पूर्ण दिवस बंद राहणार असल्याची अधिकृत घोषणा पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. pmc
पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवार, दिनांक ३० रोजी या दुरुस्तीच्या कामांची अंमलबजावणी केली जाईल. परिणामी, या दिवशी संबंधित सर्व भागांमधील नळांना पाणी येणार नाही. एवढेच नव्हे तर, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी नेहमीच्या वेळेत पाणी येणार नसून उशिरा आणि अत्यंत कमी दाबाने (लो प्रेशर) पाणीपुरवठा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या तात्काळ व अपरिहार्य परिस्थितीची नोंद घेऊन सर्व नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे आणि पाण्याचा पुरेसा साठा करून व काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, अशी विनंती pmc प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा बंद असणारे प्रमुख व विस्तृत विभाग
१. रामटेकडी टाकीवरून पाणीपुरवठा होणारा परिसर:
या पाण्याच्या टाकीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या सर्व विभागांमध्ये गुरुवारी पूर्ण दिवस पाणी बंद राहील. यामध्ये प्रामुख्याने काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण (अंशतः), महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधी नगर, तरवडे वस्ती, रामनगर झोपडपट्टी, रामटेकडी एसआरपीएफ (SRPF) परिसर, वैदुवाडी, भीमनगर, शिंदेवस्ती, ससाणेनगर ते १४ गल्ली, माळवाडी, मुंढवा, १५ नंबर, मगरपट्टा सिटी, काळेपडळ (रेल्वेच्या उजव्या बाजूकडील परिसर), केशवनगर, साडेसतरा नळी, म्हसोबा नगर, काळेबोराटेनगर, हांडेवाडी रोड आणि भुजबळ वस्ती इत्यादी भागांचा समावेश आहे. pmc
PMC: मंजूर १३ पैकी ८ पदे रिक्त; पुण्याच्या शासकीय बालरुग्णालयांची अवस्था रामभरोसे
वानवडी गावठाण, चौगुलेमळा तसेच शिताळादेवी मंदिर व त्याच्या आसपासचा संपूर्ण परिसर.
बकरी हिल टाकीवरून पाणीपुरवठा होणारा परिसर
कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, पारगेनगर, कौसरबाग, साळुंखे विहार, एनआयबीएम (NIBM) रोड, उंड्री रोड, आझादनगर, शांतीनगर, केदारीनगर, काकडे मैदान परिसर, मानेवस्ती, जांभूळकर वस्ती, जगताप चौक व लगतचा इतर परिसर, विकासनगर, शिंदे छत्री परिसर, राजीव गांधी झोपडपट्टी, संविधान चौक ते गंगा सॅटेलाईट चौक, सिद्धार्थ नगर, उंड्री रस्ता, ब्रम्हा काउंटीज आणि कोणार्क इंद्रायू.

हाय सर्व्हिस टाकीवरून पाणीपुरवठा होणारा परिसर:
बी.टी. कवडे रोड (रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी), भीमनगर, घोरपडी (अंशतः), भारत फोर्ज कंपनी लगतचा परिसर, जांभूळकर मळा, सेंट पेट्रिक टाऊन, शेवकरवस्ती, होलेमळा, एस. व्ही. नगर, लक्ष्मी नगर, घोरपडीचा उर्वरित भाग, तारादत्त कॉलनी, डांबरवाडी, ज्ञानेश्वर पार्क, निगडेनगर, ढोलेवस्ती, सिटाडेल, तसेच संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट, कॅम्प वसाहत, कमांड हॉस्पिटल, भीमपुरा गल्ली क्र. १ ते २०, मोदीखाना, साचापीर स्ट्रीट, एम. जी. रोड, इस्ट स्ट्रीट आणि जी. ई. साऊथ परिसर.
कॅम्प टाकीवरून पाणीपुरवठा होणारा परिसर:
संपूर्ण पुणे कॅन्टोन्मेंट आणि कॅम्प वसाहत.
रेसकोर्स टाकीवरून पाणीपुरवठा होणारा परिसर:
घोरपडी (अंशतः), श्रावस्ती नगर, गुलमोहर पार्क, पासपोर्ट ऑफिस परिसर आणि कोरेगाव पार्क ब्रिज परिसर.
ठाकरसी टाकीवरून पाणीपुरवठा होणारा परिसर:
Pune : शहरात डेंग्यूचा वेगाने प्रादुर्भाव; दीड महिन्यात ३०० संशयित रुग्ण आढळले
येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गाडीतळ, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामाता परिसर, मदर तेरेसा नगर, कुमार पर्णकुटी, लमाण तांडा, कामराज नगर, निळा झेंडा, लक्ष्मीनगर, भाटनगर, नुरानी मस्जिद, नेताजी नगर, गांधीनगर, कश्मीर कॉलनी, भीमा शंकर वसाहत, यशवंत नगर, खड्डा झोपडपट्टी, जज्वाला मंडळ, गजराज क्लब, डॉ. आंबेडकर वस्तीगृह, सुभाषनगर, नवी खडकी, तालिमी पर्यंतचा भाग, बाराते वस्ती, बोसले वस्ती, कुमार आंगण, संगमवाडी, जयजवान नगर, रामनगर, यु.पी. हॉटेल परिसर, अशोकनगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, बं.नं. ५, नगररोड, डंकर लाईन, कल्याणीनगर आणि अधीक्षक बंगला परिसर इत्यादी. pmc

लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजरमुळे पाणीपुरवठा बंद असणारा परिसर:
खराडी गावठाण, आपले घर, तुळजाभवानी नगर, ईऑन (EON) परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, थिटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, चंदननगर, सुनितानगर, धर्मनगर, सोमनाथनगर, गार्डेनिया, धनलक्ष्मी सोसायटी, गणेशनगर, आनंदपार्क, राजश्री कॉलनी, मतेनगर, महावीर नगर, माळवाडी आणि मुन्नुरवार सोसायटी या सर्व भागांतही पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील.
View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)


