Navaratri 2024 Color In Marathi: शारदीय नवरात्री 3 ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीत सुरू होईल. या 9 दिवसांमध्ये 9 रंगांचे आहे विशेष महत्त्व, जाणून घ्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आहे.
मुंबई :- यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्र Navaratri 2024 गुरुवार, 3 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे,
पिवळा रंग हा परिधान करणे शुभ राहील. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाईल.लाल रंग हा ‘ब्रम्हचारिणी’ देवीचा आवडता रंग लाल आहे आणि हा रंग शक्ती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे.निळा हा ‘चंद्रघंटा’ देवीचा आवडता रंग आहे. हा रंग साहस आणि सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे.‘अष्टभुजा’ देवीचा आवडता रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा संपत्तीचा, स्नेहाचे प्रतीक आहे.स्कंदमाता देवीचा आवडता रंग हिरवा आहे. हा रंग, सौभाग्य, समृद्धीचे प्रतीक आहे.करडा रंग हा राक्षस महिषासुराचा वध करणारी देवी कात्यायनी देवीचा आवडता रंग आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे.देवी पार्वतीचे सातवे रुप म्हणजे काली माता देवीचा आवडता रंग नारंगी आहे. नारंगी रंग हा बल आणि शक्तीचे प्रतीक आहे.मोरपंखी हा रंग महागौरी देवीचा आवडीचा रंग आहे. हा रंग मयूरता, सुंदरता, दृढ विश्वास आणि समृध्दीचे प्रतीक आहे.गुलाबी रंग हा सिध्दीदात्री देवीचा आवडता रंग गुलाबी आहे. महत्वाकांक्षा, आणि प्रेमाचे प्रतीक म्हणजे सद्भावाचे प्रतिक आहे.हेही वाचा: India vs Bangladesh Highlights : भारत-बांगलादेश संघ हॉटेलमध्ये परतले, पावसामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होऊ शकला नाही