Skip to content

Narendra Mehta : "मराठी मोर्चा संशयास्पद?" — नरेंद्र मेहतांचे विधान पेटवणारं!

•अमराठी मोर्चा योग्य, मराठी मोर्चा संशयास्पद?

V
Vivek

1 min read

Narendra Mehta : "मराठी मोर्चा संशयास्पद?" — नरेंद्र मेहतांचे विधान पेटवणारं!

•अमराठी मोर्चा योग्य, मराठी मोर्चा संशयास्पद?

मीरा-भाईंदर | मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी एकीकरण समितीने घेतलेल्या मोर्च्याच्या निर्णयाला पोलिसांनी परवानगी नाकारली. यानंतर शहरात मोठा तणाव निर्माण झाला असतानाच, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दिलेलं विधान नव्या वादाला तोंड फोडणारं ठरत आहे.

"मनसेच्या मोर्चामागे काही इतर राजकीय हेतू असू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कारवाई केली असावी," असं विधान आमदार मेहता यांनी केलं आहे. मात्र, याच मेहतांनी काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांनी काढलेल्या मोर्चाला खुलेआम पाठिंबा दिला होता, यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

"अमराठी हेतू स्पष्ट, मराठी आंदोलन गोंधळात?"

मेहता म्हणाले, "परप्रांतीयांनी सभागृहात मोर्चा घेतला. त्यांनी कुठलीही असभ्यता दाखवली नाही. त्यांचा हेतू स्पष्ट होता – त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याविरोधात कारवाई व्हावी. मात्र, मनसे व मराठी एकीकरण समितीचं आंदोलन गोंधळाचं वाटतंय. ते भाजपा कार्यालयावर मोर्चा नेणार होते. त्यामुळे दोन्ही गट समोरासमोर आले असते तर कायदा-सुव्यवस्थेचा धोका निर्माण झाला असता."

"मेहता यांची भाषा मराठी जनतेचा अवमान?"

मेहता यांच्या या विधानावर राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
"परप्रांतीय मोर्चा शांत आणि योग्य ठरवणं, तर मराठी मोर्च्यावर संशय घेणं म्हणजे दुजाभावाचा कळस आहे," असा आरोप अनेकांनी केला आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे की, "मोर्चा कोण घालतंय, हे महत्त्वाचं की मुद्दा काय आहे, हे?"
मेहतांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्येही अंतर्गत अस्वस्थता वाढली असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा: Bhaskar Jadhav vs Bharat Gogawale : 'ॐ फट स्वाहा!’ – विरोधकांची गोगावले यांच्यावर विधानभवनात मंतरलेली टीका

Share