Skip to content

Mumbai Local Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे!मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर उद्या रविवार (25 मे) मेगाब्लॉक!

•रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वेचा मेगाब्लॉक

V
Vivek

1 min read

Mumbai Railway Update : प्रवाशांनी लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७ दिवसांचा विशेष पॉवर ब्लॉक, काय असेल लोकलचे वेळापत्रक?

•रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई :-मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून रविवारी घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पाडा. कारण ब्लॉकवेळेत रेल्वेरुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.माटुंगा ते मुलुंड आणि ठाणे ते वाशी / नेरूळ दरम्यान मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक घोषित करण्यात आला आहेत.

मध्य रेल्वे
माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 03.55 ब्लॉक घेण्यात येणार असून या वेळेत अप-डाउन धिम्या मार्गावरील लोकल अप-डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे 20 मिनिटे विलंबाने धावणार आहे.

ट्रान्स-हार्बर
ठाणे ते वाशी / नेरूळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ट्रान्स-हार्बरवरील ठाणे ते वाशी / नेरूळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. हार्बर रेल्वे वरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान रेल्वे वाहतूकीवर ब्लॉक नसल्याने लोकल फेऱ्या वेळापत्रकानूसार धावणार आहेत.

पश्चिम रेल्वे (रात्रकालीन ब्लॉक)
भाईंदर ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री 11.30 ते पहाटे 4.45 या वेळेत भाईंदर ते बोरिवलीदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गिकवर स्वतंत्र ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. बोरिवली ते विरार / वसई रोडदरम्यान जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या काही लोकल फेऱ्या रद्द राहणार काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.पश्चिम रेल्वेवर भाईंदर ते बोरिवलीदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

हेही वाचा: Kanjurmarg Hit And Run Case : मुंबईत कांजुरमार्गमध्ये हिट अँड रन; फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू!

Share