Skip to content

Mumbai News : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक मोठा झटका! हॉटेलमधील खाणं-पिणं 10 ते 15 टक्क्यांनी महागणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

Mumbai News :मुंबई :- वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक मोठा फटका बसणार आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

मुंबईकरांना महागाईचा आणखी एक मोठा झटका! हॉटेलमधील खाणं-पिणं 10 ते 15 टक्क्यांनी महागणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक मोठा झटका! हॉटेलमधील खाणं-पिणं 10 ते 15 टक्क्यांनी महागणार; 'आहार' संघटनेचा निर्णय

Mumbai News : भाजीपाला, कडधान्ये आणि व्यावसायिक गॅसच्या दरवाढीचा फटका; पुढील आठवड्यापासून नवे दर लागू होण्याची शक्यता

Mumbai News :मुंबई :- वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशाला आणखी एक मोठा फटका बसणार आहे. मुंबई आणि परिसरातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांच्या दरात 10 ते 15 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याचा निर्णय 'इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' (आहार) या संघटनेने घेतला आहे. किरकोळ बाजारातील भाजीपाला, धान्य आणि कडधान्यांच्या वाढत्या किंमती तसेच व्यावसायिक गॅस व जागांच्या भाड्यात झालेली वाढ यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, आगामी आठवड्यात मुंबईकरांचे बाहेर जेवणे महागणार आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

महागाईचे कारण आणि व्यवस्थापनाचा वाढता खर्च; मेन्यू कार्डमध्ये होणार बदल

'आहार' संघटनेचे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून बाजारात शेतमालाची आवक मंदावल्याने भाजीपाला, विविध डाळी आणि खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याशिवाय व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आणि हॉटेलचे भाडे व इतर व्यवस्थापकीय खर्च वाढल्यामुळे हॉटेल चालवणे कठीण झाले आहे. यामुळे रेस्टॉरंट चालकांना खाद्यपदार्थांच्या किमतीत 10 ते 15 टक्के किंवा प्रति पदार्थ 10 ते 20 रुपयांपर्यंत वाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मुंबई व उपनगरात या संघटनेचे 25 हजारांहून अधिक सदस्य (रेस्टॉरंट आणि बार) असून, सर्वच ठिकाणी हे नवे दर लवकरच लागू केले जाणार आहेत.

नोकरदार, विद्यार्थी आणि बाहेर जेवणाऱ्या ग्राहकांच्या मासिक बजेटवर होणार परिणाम

या दरवाढीचा थेट परिणाम मुंबईत नोकरीनिमित्त राहणारे तरुण, शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी आणि हॉटेल वा ऑनलाईन जेवणावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या मासिक बजेटवर होणार आहे. आधीच घरगुती महागाईमुळे मेटाकुटीस आलेल्यासामान्यांना आता हॉटेलच्या चहा-नाश्त्यापासून ते जेवणापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याने सर्वसामान्य वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

Share