Mumbai Crime News : दारूच्या पैशांवरून वैर – पतीच्या रागात संपलं पत्नीचं आयुष्य!
•गोरेगावमध्ये रात्रीच्या वादानंतर पतीने गळा दाबून पत्नीचा केला खून,बांगूरनगर पोलिसांची तातडीची कारवाई; आरोपी पतीला अटक
1 min read

•गोरेगावमध्ये रात्रीच्या वादानंतर पतीने गळा दाबून पत्नीचा केला खून,बांगूरनगर पोलिसांची तातडीची कारवाई; आरोपी पतीला अटक
मुंबई | दारूसाठी मागितलेल्या पैशांना नकार दिल्याने पतीने थेट पत्नीचा जीव घेतल्याची संतापजनक घटना गोरेगावमधील भगतसिंग नगरमध्ये सोमवारी उशिरा घडली.पती वसिम रफीक शेख (नाव) याने पत्नी गौसिया वासिम शेख (वय 35) हिचा गळा दाबून खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी रात्री उशिरा घरात वसिम आणि गौसियामध्ये वाद झाला. वसिमने दारू खरेदीसाठी पैसे मागितले. मात्र गौसियाने नकार दिल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत गेलं आणि संतप्त वसिमने गौसियाचा गळा दाबून तिला बेशुद्ध केलं. तातडीने तिला गोरेगावच्या ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
बांगूरनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
हेही वाचा: Bhandup News : नाल्यालगतच्या घराची भिंत कोसळली; सकाळच्या वेळी हनुमान नगर हादरलं!


