Skip to content

Maharashtra Politics : राजकीय वर्तुळात खळबळ: शरद पवार गट एनडीएच्या वाटेवर ?

Maharashtra Politics : राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय पटलावर सुरु आहे.

DO
Dhanshree Otari

3 min read

Maharashtra Politics

Maharashtra Politics : २० तारखेनंतर मोठ्या घडामोडींचे संकेत

Maharashtra Politics : राज्यासह देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार असल्याची चर्चा सध्या राजकीय पटलावर सुरु आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार फुटले. त्यानंतर आता शरद पवार गट देखील मोठी भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही, तर दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 'एनडीए' (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सोबत हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या २० जुलै नंतर राज्यासह देशाच्या राजकारणात अत्यंत नाट्यमय आणि मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. ( Maharashtra Politics sharad pawar nda update)

आमदारांचा 'एनडीए'कडे कल

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच, शरद पवार गटाच्या आमदारांची विधान भवनात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार रोहित पवार वगळता पक्षाचे इतर सर्व ९ आमदार उपस्थित होते. या बैठकीत ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सर्व आमदारांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. Maharashtra Politics

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत उपस्थित असलेल्या बहुतांश आमदारांचा कल भारतीय जनता पक्षासोबत जाण्याकडे आहे. "आपल्या मतदारसंघातील रखडलेली विकासकामे, त्यासाठी लागणारा निधी आणि २०२९ च्या आगामी निवडणुकांचा विचार करता, भाजपप्रणीत एनडीएचा घटक पक्ष होणे हिताचे ठरेल," अशी स्पष्ट भूमिका या आमदारांनी मांडली आहे. विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत (सुनेत्रा पवार गट) विलीन न होता थेट एनडीएचा स्वतंत्र घटक पक्ष म्हणून राहावे, अशी सूचनाही आमदारांनी केल्याचे समजते. Maharashtra Politics

जयंत पाटील यांची भूमिका आणि 'चेंडू' पवारांच्या कोर्टात

आमदारांशी चर्चा केल्यानंतर जयंत पाटील यांनी त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. "पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल," असे आश्वासन पाटील यांनी दिले आहे. सध्या हा संपूर्ण राजकीय चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात आहे. एनडीएसोबत जाण्याच्या या पर्यायावर शरद पवार नेमका काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

CBT: MPSC परीक्षा रोहित पवार आक्रमक

शरद पवार स्वतः मैदानात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विषयावर अंतिम निर्णय घेण्यासाठी लवकरच शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत. ते लवकरच पक्षाचे सर्व खासदार आणि आमदारांची एकत्रित बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतरच शरद पवार गटाची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, मंगळवारी रात्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'वर्षा' निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

तर रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर

या संपूर्ण घडामोडींपासून आमदार रोहित पवार यांनी स्वतःला वेगळे ठेवले आहे. भाजपसोबत जाण्याच्या पर्यायाला त्यांचा तीव्र विरोध असल्याचे समजते. सूत्रांनुसार, पक्षाच्या आमदारांची बैठक सुरू असताना रोहित पवार गैरहजर होते, मात्र त्यानंतर त्यांनी फोनवरून सर्व आमदारांशी संपर्क साधून त्यांची मते जाणून घेतली. दरम्यान, एका गटाकडून असा दावा केला जात आहे की, भविष्यात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील हे एनडीएच्या मार्गाने जातील, तर रोहित पवार हे काँग्रेसमध्ये सहभागी होऊ शकतात. या दाव्यामुळे पवार कुटुंबात आणि पक्षात फूट पडणार का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

'गोड बातमी'चे गुढ

काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्या लग्नासंदर्भात बोलताना, "लवकरच एक गोड बातमी तुमच्या कानावर येईल," असे सूचक विधान केले होते. आता या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, सुप्रिया सुळे यांच्या त्या विधानाचा अर्थ नेमका काय होता, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Maharashtra Politics

Pmc Politics : भाजप-राष्ट्रवादी युतीची दाट शक्यता

राज्यातील महाविकास आघाडीचे भवितव्य आणि शरद पवार गटाची पुढील वाटचाल यावर येत्या काही दिवसांत पडदा उठणार आहे. २० तारखेनंतर होणाऱ्या संभाव्य हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती कलाटणी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Share