Skip to content

Heramb Karmarkar : होर्मुझ सामुद्रधुनीतील क्षेपणास्त्र हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू

International-इराण अमेरिका हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू

PK
Pratiksha Kate

2 min read

Heramb Karmarkar

Heramb Karmarkar : होर्मुझ सामुद्रधुनीतील क्षेपणास्त्र हल्ल्यात पुण्याचे मरिन इंजिनिअर हेरंब करमरकर शहीद

Heramb Karmarkar : होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात बेपत्ता झालेल्या पुण्यातील मरिन इंजिनिअर हेरंब करमरकर यांच्या मृत्यूची अखेर पुष्टी झाली आहे. ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ या कंटेनर जहाजावर तिसरे अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या हेरंब यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मंगळवारी कंपनीकडून देण्यात आली. या वृत्तामुळे पुण्यातील करमरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.( Heramb Karmarkar )

हेरंब करमरकर यांचे नातेवाईक ऋषी टंडन यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांकडून हेरंब आता आपल्यात नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे निकटवर्तीय विवेक टंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी संबंधित शिपिंग कंपनीकडून हेरंब यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली. सध्या त्यांचे पार्थिव ओमान नौदलाच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले आहे(Heramb Karmarkar )

Moshi Garbage Depot : एएलआर कंपनीच्या प्रोजेक्ट हेड आणि सेफ्टी ऑफिसरला अटक

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव कंपनीकडे सुपूर्द केले जाईल. त्यानंतर ते भारतात आणण्यात येणार आहे. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाकडून अद्याप थेट संपर्क झालेला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले असून, हेरंब यांचे पार्थिव कोणताही विलंब न करता सुरक्षितपणे भारतात आणावे आणि कुटुंबीयांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

होर्मुझमध्ये जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमव्ही जीएफएस गॅलेक्सी’ हे मालवाहू कंटेनर जहाज रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीनच्या सुमारास ओमानच्या समुद्री हद्दीजवळून जात असताना त्यावर प्रक्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यामुळे जहाजाच्या इंजिन रूममध्ये आग लागली आणि मोठे नुकसान झाले. परिणामी जहाजाचा प्रवास थांबवावा लागला.( Heramb Karmarkar )

हल्ल्यानंतर जहाजावरील कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लाइफबोटच्या माध्यमातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली. जहाजावर एकूण २४ कर्मचारी होते, त्यापैकी ११ भारतीय नागरिक होते. ओमानच्या रॉयल नेव्हीने कारवाई करत सुमारे दोन तासांच्या आत २३ कर्मचाऱ्यांची सुटका केली. मात्र, हल्ल्याच्या वेळी इंजिन रूमजवळ असलेले हेरंब करमरकर बेपत्ता झाले होते. ( Heramb Karmarkar )

PUNE CRIME : पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीचे कनेक्शन पुण्यात

शेवटचा संपर्क रविवारी पहाटे

हेरंब करमरकर यांचा कुटुंबीयांशी शेवटचा संपर्क रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे २ वाजून ४९ मिनिटांनी झाला होता. त्यावेळी त्यांनी जहाजाने होर्मुझ सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केल्याचे कुटुंबीयांना कळवले होते. त्यानंतर काही तासांनी जहाजावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली.( Heramb Karmarkar )

कुटुंबीयांच्या माहितीनुसार, हेरंब हे त्यांच्या समुद्री सेवेत तीन महिन्यांहून अधिक काळ जहाजावर कार्यरत होते. त्यांची सेवा पूर्ण करून ते लवकरच भारतात परततील, अशी अपेक्षा कुटुंबीयांना होती. मात्र, त्याआधीच झालेल्या या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

भारतीय जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

या घटनेनंतर भारतीय समुद्री कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया (FSUI) ने भारतीय जहाजांना लक्ष्य केले जात असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच हेरंब यांच्या स्थितीबाबत अधिकृत माहिती मिळण्यास झालेल्या विलंबावरही नाराजी व्यक्त केली आहे.

युनियनने सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू असतानाही भारतीय नौदल कर्मचारी आणि व्यापारी जहाजांवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे .(Heramb Karmarkar )

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेत अधिकारी निलंबित

दरम्यान, अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडूनही या घटनेची माहिती देण्यात आली असून, हल्ल्यानंतर जहाजाला आग लागल्याने आणि इंजिन रूमचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Crime : पालखी सोहळ्यात दागिने पळवणारी महिला टोळी जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

हेरंब करमरकर यांच्या पार्थिवाच्या भारतात आगमनाकडे आता कुटुंबीयांसह पुणेकरांचे लक्ष लागले आहे. आपल्या मुलावर आणि कुटुंबातील सदस्यावर मायभूमीत अंत्यसंस्कार करता यावेत, यासाठी करमरकर कुटुंबीय केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. (Heramb Karmarkar )

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share