Eknath Shinde hospitalized : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल
मुंबई, महाराष्ट्र मिरर
3 min read

Eknath Shinde hospitalized : ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू
मुंबई, महाराष्ट्र मिरर
Eknath Shinde hospitalized : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रात्री उशिरा ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांतील प्रचंड धावपळ, कामाचा अतिताण आणि 'व्हायरल फिव्हर' यामुळे त्यांना हा त्रास झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. (Eknath Shinde hospitalized )

विधिमंडळ कामकाजादरम्यानच जाणवला त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी विधिमंडळाचे अधिवेशन आणि कामकाज सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अचानक तीव्र ताप आला. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर अशक्तपणा जाणवू लागला होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना तात्काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. ( Eknath Shinde hospitalized ) मात्र, ताप उतरत नसल्याने आणि अशक्तपणा वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना ठाण्यातील खाजगी ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.
हेही वाचा: Pune News: हडपसर-दिवेघाट मार्ग आज दुपारी दोन तास पूर्णपणे बंद
शिवसेनेतील अधिकृत सूत्रांनी आणि त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून उपचार वेगाने सुरू आहेत. प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याने कदाचित आजच (शनिवारी) त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाण्याची शक्यता आहे. ( Eknath Shinde hospitalized )
https://www.instagram.com/p/DaVDoX3MqIA
मागील काही महिन्यांपासून राज्यातील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगवान झाल्या आहेत. त्यातच पक्षाचा विस्तार आणि संघटनात्मक बांधणीसाठी एकनाथ शिंदे हे अहोरात्र कार्यरत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यात "टायगर ऑपरेशन" राबवून ठाकरे गटाच्या काही प्रमुख खासदारांना आपल्या पक्षात प्रवेश दिला होता. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनाही शिवसेनेत आणून त्यांनी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला होता. ( Eknath Shinde)
Sting Drink Ban: शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ ड्रिंकच्या विक्रीवर बंदी
या सलग राजकीय घडामोडी, बैठकांचे सत्र, दौरे आणि विधिमंडळाचे चालू अधिवेशन यामुळे त्यांना गेल्या काही दिवसांत पुरेशी विश्रांती मिळाली नव्हती. या शारीरिक दगदगीमुळे आणि हवामानातील बदलामुळे त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाले आणि ताप वाढला.
महत्त्वाचे दौरे आणि पक्षप्रवेशाचे कार्यक्रम रद्द
उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे पुढील काही दिवसांचे सर्व नियोजित शासकीय दौरे, बैठका आणि राजकीय कार्यक्रम तात्पुरते पुढे ढकलण्यात आले आहेत. काल (शुक्रवारी) दुपारी मुंबईत एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार होता, परंतु शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने हा महत्त्वाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करावा लागला. ( Eknath Shinde hospitalized )
RTI: माहिती अधिकार कायद्यातील जाचक बदलांना अखेर स्थगिती
डॉक्टरांनी त्यांना पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असून, पूर्णपणे बरे झाल्यानंतरच ते पुन्हा आपल्या सक्रिय दौऱ्यावर आणि शासकीय कामकाजावर परतणार आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्या कार्यालयाशी आणि कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणुका होण्याची चर्चा
शिवसेना पक्षामध्ये तब्बल २२ वर्षांनंतर पहिल्यांदाच पक्षांतर्गत निवडणुका होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकांचे बिगुल जुलै अखेरीस वाजण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने पार पडणार असून, एकूण सात टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ( Eknath Shinde hospitalized )
https://english.maharashtramirror.com/credai-pune-provides-100-traffic/
शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांना पक्षाचे मुख्यनेते पद देण्यात आले होते. आत्ता देखील ते पक्षाचे मुख्यनेते आहेत. एकनाथ शिंदे यांना स्वतःलाही त्यांच्या 'मुख्य नेता' या पदासाठी या अंतर्गत निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
मध्यरात्री 2 वाजता शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीच्या तिकिटावर लढवणाऱ्या आणि सुमारे 50 हजार मते घेणाऱ्या धुळ्यातील ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश अखेर पूर्ण झाला.
दुपारचा नियोजित सोहळा पुढे ढकलण्यात आल्यानंतर, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर म्हणजेच रात्री 2 वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे शुभांगी पाटील यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला.


