Skip to content

Devendra Fadnavis : फडणवीसांना विठुराया पावणार?

Devendra Fadnavis : आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची शासकीय महापूजा केली आणि विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले.

DO
Dhanshree Otari

2 min read

devendra fadnavis

Devendra Fadnavis : पंढरपूर दौऱ्यावर असणारे फडणवीस अचानक दिल्लीला रवाना

Devendra Fadnavis : आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची शासकीय महापूजा केली आणि विठुरायाचे मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान, पंढरपूर दौऱ्यावर असणारे फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झाले आहेत. अशातच, देशासह राज्यभर सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांना विठुराया पावणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. Devendra Fadnavis Education Minister Delhi

गेल्या काही दिवसांपासून फडणवीस दिल्लीला जाणार असल्याची अटकळ राजकीय व्यासपीठावर बांधली जात आहे. विशेष म्हणजे आज विठुरायाच्या दर्शन घेतानादेखील फडणवीस यांनी संकेत दिले. 'पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला, दिल्लीत काम करण्याची किंवा देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर… जे दिलं आहे ते उत्तम आहे. चित्त नेहमी समाधानी असू द्यावं असं आपण म्हणतो ना. तुका म्हणे उगे रहावे, जे जे होईल ते पहावे, चित्त असू द्यावे समाधानी.. तसा समाधानी आहे मी “अशी प्रतिक्रिया दिल्ली जाण्याच्या चर्चेवर फडणवीस यांनी केली.

Dharmendra Pradhan : विद्यार्थ्यांच्या आंदोलना पुढे केंद्र सरकारची माघार; धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा

अशातच धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा आणि थेट पंढरपूर दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री दिल्लीला रवाना या सर्वा घडामोडीमुळे लवकरच फडणवीस केंद्राच्या सत्तेत सामील होणार या चर्चेला उधाण आले आहे. Devendra Fadnavis

संजय राऊतांचा दावा खरा ठरणार?

एकीकडे प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे शिक्षणमंत्री कोण होणार अशी चर्चा सुरू असतानाच, संजय राऊतांनी खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. धर्मेंद्र प्रधान हे नवे केंद्रीय शिक्षणमंत्री होऊ शकतात, असा दावा राऊत यांनी केला आहे.

Dharmendra Pradhan : “जबाबदार पदांवर बसलेल्यांनीच अडथळे आणले”; राजीनामा देताना धर्मेंद्र प्रधान यांचे गंभीर आरोप

कदाचित मला असे वाटते की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर नवे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून फडणवीस यांना संधी मिळू शकते. कारण ते वकील आहेत, शिक्षित आहेत. अनेक विषय मांडत असतात. मला ही शक्यता जास्त वाटते. केंद्रात जाण्याबाबत अनेक चर्चा होत्या. आता योगायोग आला. मंत्रिपद रिक्त झालं. आता फडणवीसांना संधी मिळू शकते, असे राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. Devendra Fadnavis

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेल्या 1 महिन्यापासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. त्यासाठी 20 जुलै रोजी संसदेवर भव्य असा मोर्चा देखील काढण्यात आला होता. यावेळी पोलिस आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच झटापट झाली होती. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून विद्यार्थी जंतर मंतरवर दाखल झाले होते. प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी सोनम वांगचूक यांनी उपोषण सुरू केलं हतो. devendra fadnavis

Tech Mahindra : आजारी मुलीच्या संगोपनासाठी रजा घेतल्याने कर्मचाऱ्याला बडतर्फ; टेक महिंद्राच्या दुंडीगल कॅम्पसबाहेर तीव्र निदर्शने

तब्बल 25 दिवस त्यांनी उपोषण केलं, त्यानंतर 26 व्या दिवशी त्यांनी आपलं उपोषण सोडलं. परंतु जरी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं असलं तरी देखील धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं कॉकरोच जनाता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी जाहीर केलं होतं. अखेर या आंदोलनाला यश आले आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share