Skip to content

Crime News : १७ वर्षीय युवकाच्या खून प्रकरणातील आरोपींची पावसात धिंड

पुणे, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

2 min read

Pune Police

Crime News : भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणून त्यांची कारच्या बोनेटवर बसवून धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे, महाराष्ट्र मिरर

Crime News: बहिणीशी झालेल्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने १७ वर्षीय युवकावर कोयत्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना कात्रज परिसरात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, मंगळवारी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणून त्यांची कारच्या बोनेटवर बसवून धिंड काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांच्या या आक्रमक कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. Crime News

Pune Police : ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत धडक कारवाई; मटका अड्डे उद्ध्वस्त, १५.८० ग्रॅम ‘एमडी’ अमली पदार्थ जप्त

गणेश रवींद्र माळवे (वय १७, रा. कात्रज गाव) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. या प्रकरणी गणेश रामदास चव्हाण (वय २२, रा. गुजर वस्ती, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश चव्हाण आणि मृत गणेश माळवे हे दोघे बालपणीचे मित्र आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी गणेश माळवे याचा आकाश नावाच्या तरुणाच्या बहिणीसोबत वाद झाला होता. याच वादाच्या राग मनात धरून आकाश गणेशवर प्रचंड चिडून होता आणि त्याने यापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

घटनेच्या दिवशी रात्री १० वाजता गणेश माळवे याचा मोबाईल कात्रज कट्टा येथील एका दुकानात दुरुस्तीसाठी दिला होता. तो मोबाईल आणण्यासाठी गणेश चव्हाण आपल्या मित्राला सोबत घेऊन कात्रज कट्टा येथे गेले होते. दुकानदाराने मोबाईल दुरुस्त करून दिल्यानंतर दोघेही तो पाहत असतानाच, अचानक दोन-तीन गाड्यांवरून आकाश आणि त्याचे साथीदार हातात लोखंडी हत्यारे घेऊन तिथे आले.

VTP Beaumonde : बिल्डर भूषण पालरेषांच्या अडचणीत वाढ; महारेराकडून …

आरोपींना पाहताच गणेश माळवे जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागला. मात्र, हल्लेखोऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर तसेच हातावर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळल्यानंतरही नराधम त्याच्यावर वार करतच राहिले. हल्लेखोर पळून गेल्यानंतर जखमी गणेशला तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. crime News

घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवत या प्रकरणातील आरोपींच्या आवळल्या मुसक्या आहेत. दाखल गुन्ह्यातील आरोपींमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करीत आहेत. घटनेनंतर परिसरात एकच तणाव व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

View this post on Instagram A post shared by Maharashtra Mirror (@maharashtramirrornews)

Share