CRIME NEWS : आंबेठाणमध्ये मजुरावर कटरने खुनी हल्ला
आरोपीला केली अटक
PG
Prashik Ghaste
1 min read

आरोपीला केली अटक
पिंपरी, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: भावाकडे जेवण्यासाठी गेलेल्या एका मजुरावर कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील आंबेठाण येथे बुधवारी (१० जून) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली आहे.CRIME NEWS

या प्रकरणी जगन्नाथ केदार यादव (३८, रा. आंबेठाण, खेड) यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संतोष रामकिशन यादव (२७, रा. खराबवाडी, खेड, मूळ रा.- उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.CRIME NEWS
फिर्यादी जेवण करत असताना आरोपीने त्यांना फोन करून खोलीबाहेर बोलावले. फिर्यादी बाहेर येताच आरोपीने जुन्या कारणावरून शिवीगाळ करत खिशातील कटर काढून फिर्यादीवर वार करून गंभीर दुखापत केली.
या प्रकरणाचा पुढील तपास उत्तर महाळुंगे पोलीस करत आहेत.
CRIME NEWS


